भारतीय क्रिकेटचा इतिहास खूपच चांगला राहिला आहे. वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर आतापर्यंत अनेक खेळाडूंनी भारतीय संघाकडून खेळताना यश प्राप्त केले आहे. भारताकडून खेळताना काही खेळाडूंची कारकीर्द अतिशय चांगली राहिली, तर काही खेळाडू संघात स्थान पक्के करण्यात अयशस्वी ठरले. त्यांना कामगिरीत सातत्य ठेवता आले नाही.
वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले, तर त्यामध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), विराट कोहली (Virat Kohli), विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag), एमएस धोनी (MS Dhoni) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) यांच्यासारख्या अनेक दिग्गज खेळाडू खेळले आहेत. .
परंतु या दरम्यान, असे काही खेळाडू भारताकडून वनडे सामने खेळण्यात यशस्वी ठरले. ज्याबद्दल तुम्हाला क्वचितच माहीत असेल. त्यातील ४ खेळाडूंचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे. ज्यांनी भारताकडून वनडे सामने खेळले आहेत. परंतू काही कालावधीनंतर ते विस्मृतीत गेले.
भारतीय संघाकडून खेळणारे ४ खेळाडू जे क्वचित चाहत्यांनाच माहीत आहेत- These 4 Players have ever played ODI Matches for India
१. वसीम जाफर
भारतीय क्रिकेट संघाच्या देशांतर्गत क्रिकेट विषयी बोलताना मुंबईचा दिग्गज फलंदाज वसीम जाफरचा (Wasim Jaffer) समावेश महान फलंदाजांमध्ये आवर्जून केला जातो. वसीम जाफरची प्रथम श्रेणी कारकीर्द जबरदस्त होती. त्याने बरीच वर्षे आपल्या कामगिरीत सातत्य राखलं. जाफरने भारतासाठी काही कसोटी सामनेही खेळले आहेत.
जाफर एक कसोटी फलंदाज असला, तरी त्याने भारतीय संघाकडून वनडे सामन्यातही फलंदाजी केली आहे. २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने वनडे क्रिकेटमध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यात त्याने दोन सामने खेळले. यामध्ये त्याला केवळ १० धावाच करता आल्या. त्यानंतर तो कधीही वनडे सामने खेळू शकला नाही.
२. नमन ओझा
भारतीय क्रिकेट संघात असे काही यष्टीरक्षक फलंदाज आले आहेत. जे चुकीच्या काळात आले असे म्हटले जाते. यात मध्य प्रदेशचा यष्टीरक्षक फलंदाज नमन ओझा (Naman Ojha) याचेही नाव आहे. ओझाकडे क्षमतेचा अभाव नव्हता. परंतु यष्टीरक्षकांमधील स्पर्धेमुळे तो भारतीय संघासाठी जास्त खेळू शकला नाही.
ओझा भारतीय संघाकडून १ कसोटी सामना खेळला आहे. तसेच, याव्यतिरिक्त ओझाने भारताकडून वनडे क्रिकेटही खेळल आहे. २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध ओझाला केवळ एक वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. पण त्या सामन्यात तो फक्त १ धाव करू शकला. त्यानंतर त्याला वनडे सामन्यात खेळण्याची पुन्ही कधीही संधी मिळाली नाही.
३. फैज फजल
फैज फजल (Faiz Fazal) देखील एकदा भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीमध्ये दिसला होता. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालं होत. २०१५ मध्ये झिम्बाब्वे दौर्यावर त्याला संघात खेळण्याची संधी मिळाली होती.
पहिल्याच वनडे सामन्यात त्याने अर्धशतक केलं होतं. त्यानंतर अनुभवी खेळाडू संघात आल्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आलं. त्यानंतर तो वनडे संघात कधीच पुनरागमन करू शकला नाही.
४. गुरकीरतसिंग मान
गेल्या अनेक वर्षांपासून पंजाब क्रिकेट संघात खेळताना गुरकीरत सिंग मान (Gurkeerat Singh Mann) याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी आहे. गुरकीरत सिंगने पंजाबकडून खेळताना आपल्या गोलंदाजी व फलंदाजीने प्रभावी कामगिरी बजावली आहे. तसेच, तो अजूनही संघात कायम आहे. याशिवाय गुरकीरत सिंगने अनेक वेळा आयपीएलमध्येही खास ठसा उमटविला आहे.
या पंजाबच्या अष्टपैलू खेळाडूलाही याच कारणास्तव भारतीय संघाचे तिकीट मिळाले. एकदा त्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध संघात स्थान मिळालं होत. पण त्यानंतर त्याला २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पण त्याने ३ वनडे सामन्यात केवळ १३ धावा केल्या. तसेच एकही विकेट घेतली नाही. त्यानंतर तो पुन्हा संघात परतू शकला नाही.
ट्रेंडिंग लेख –
भारतासाठी फक्त १ कसोटी सामना खेळू शकलेले ५ खेळाडू; एक आहेत विश्वविजेत्या दिग्गज खेळाडूचे वडील
महिला क्रिकेटपटूंनी केलेले ‘ते’ ५ विक्रम, जे पुरुष क्रिकेटपटूंनाही मोडणे केवळ अशक्य
कोण म्हणतं ‘प्रेम’ एकदाच होतं, या क्रिकेटरला झालंय १० वेळा