ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या खेळीची जेवढी चर्चा होते. त्यापेक्षा जास्त त्याच्या वैयक्तिक आयुष्याची होते. आपण सर्वांनीच ही म्हण ऐकली असेल, ‘प्यार सिर्फ एक बार होता हैं, बार बार नही,’ पण ही म्हण वॉर्नच्या आयुष्यासाठी लागू होत नाही.
कारण त्याने त्याच्या आयुष्यात एका नाही, तर अनेक मुलींना आपलं हृदय दिलं आहे. त्याने त्याच्या आयुष्यात इतक्या मुलींवर प्रेम केलं आहे, की तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटेल. त्याच्या या यादीत मॉडेलपासून अभिनेत्रीपर्यंतच्या सर्व मुलींचा समावेश आहे.
या लेखात त्याच्या प्रेमिकांचा आढावा घेण्यात आला आहे.
लिज हर्ले
शेन वॉर्नने (Shane Warne)२००५ मध्ये सिमोन कॉलहानला घटस्फोट दिला होता. त्यानंतर वॉर्न आपल्या अफेअरमुळे सतत चर्चेत राहिला. घटस्फोटानंतर शेन वॉर्नचे अभिनेत्री लिझ हर्ले (Liz Hurley) सोबतचे संबंध सर्वात प्रदीर्घ आणि चर्चेत राहिले. २०१० साली दोघांची भेट झाली होती.
परंतु ३ वर्षानंतर म्हणजेच २०१३ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, हर्लेचे तिच्या एका माजी प्रियकराबरोबर जवळचे नाते, दोघांच्या ब्रेकअप होण्यामागील कारण असल्याचे म्हटले जाते.
दोन मॉडेल्सबरोबर एकसोबत अफेअर
२००६ मध्ये वॉर्नचे नाव दोन मॉडेल्स बरोबर एकत्र जोडले गेले होते. त्यातील एक न्यूझीलंडची बोराली (Borali) होती, तर दुसरी महिला एमा (Ema) ही टीव्ही सादरकर्ता होती.
कॅथरीन
वॉर्न पेक्षा जवळपास २० वर्षांनी लहान असलेली लंडनची कायद्याचं शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कॅथरीन (Catherine) बरोबर वॉर्नला बर्याच वेळा पाहिले गेले होते. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, या दोघांमध्ये खूप जवळचे संबंध होते.
मॉडेल एमिली
एमिली (Emily) आणि वॉर्नची पहिली भेट जुलै महिन्यात २०१४ मध्ये झाली होती. ज्यानंतर या दोघांच्या अफेअरबाबत बर्याच बातम्या आल्या. एवढेच नव्हे, तर वॉर्न एमिली आणि त्याच्या तीन मुलांसमवेत युरोपच्या दौर्यावर गेले होते. परंतु हे संबंधही जास्त काळ टिकले नाहीत आणि केवळ ३ महिन्यांत दोघे वेगळे झाले.
काइली बोल्डी
वॉर्न पुन्हा एकदा आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. वॉर्नचे नाव सध्या त्याचा मित्र मायकेल क्लार्क (Michael Clarke) ची माजी पत्नी कायली बोल्डी (Kyly Boldy) हिच्याशी जोडले जात आहे. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू कायलीला आपल्या प्रेमात पाडण्याचा प्रयत्न करत आहे. वॉर्न सोशल मीडियावर कायलीचा प्रत्येक फोटो लाईक करत आहे. ज्यामुळे असे दिसते, की कायलीबरोबर जवळीक साधण्यासाठी तो खूपच उत्सुक झाला आहे. या वर्षाच्या सुरूवातीलाच क्लार्क आणि कायलीचा घटस्फोट झाला आहे.
या सर्वा व्यतिरिक्त वॉर्नचे नाव अमेरिकन अभिनेत्री ब्रायनी एडल्सटन (Brynne Edelsten), बिझनेसवुमन मिशेल मोन (Michelle Mone), मॉडेल सिमोन टून (Simon Toone) आणि बुटीक मध्ये काम करणारी एडले एंजेलेरी हिच्याशीही जोडले गेले आहे.