आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. भारतातील कोरोना व्हायरसचे वाढते प्रमाण लक्षात हा हंगाम भारताबाहेर युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ८ संघांनी युएईला जाण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने तर चेन्नईमध्ये खेळाडूंसाठी सराव शिबिरही आयोजित केले आहे. हे शिबिर १५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.
या शिबिरासाठी पुण्यातील केदार जाधव आणि ऋतुराज गायकवाड हे खेळाडू विशेष विमानाने आज (१४ ऑगस्ट) चेन्नईला पोहचले आहेत. याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे दोन्ही खेळाडू आयपीएल २०२० साठी चेन्नई सुपर किंग्स संघाचे भाग आहेत.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1294234228788326400
त्यांच्याव्यतिरिक्त आज चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी देखील रांचीहून चेन्नईला पोहचला आहे. तसेच चेन्नईला पोहचलेल्या अन्य खेळाडूंमध्ये सुरेश रैना, दीपक चाहर, कर्ण शर्मा, पियुष चावला या चेन्नई सुपर किंग्समधील स्टार खेळाडूंचाही समावेश आहे. या सर्वांचे फोटो चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडिया अकाउंटवरुनही शेअर करण्यात आले आहेत.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1294231020644913154
https://twitter.com/ChennaiIPL/status/1294179922601111558
https://twitter.com/ImRaina/status/1294225191774584832
चेन्नई सुपर किंग्सच्या या शिबिरात तमिळनाडूमधील खेळाडूही समील होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या तरी कोणतेही परदेशी खेळाडू या शिबिरासाठी आलेले नाही. तसेच चेन्नई सुपर किंग्स संघातील सर्व परदेशी खेळाडू तसेच परदेशी प्रशिक्षकही दुबईमध्येच संघाशी जोडले जाण्याची शक्यता आहे.
तसेच या शिबिरादरम्यान खेळाडूंना सुरक्षिततेची काळजीही घ्यावी लागणार आहे. तसेच प्रोटोकॉलनुसार युएईला जाण्याआधी सर्व खेळाडूंची कोरोना चाचणीही होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघ २१ ऑगस्टला युएईला रवाना होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
वयाच्या १८ व्या वर्षी एमएस धोनीला ओळख मिळवून देणाऱ्या स्पर्धेबद्दल घ्या जाणून…
चेन्नईचा हुकमी एक्का रविंद्र जडेजा दिसणार नाही सीएसकेसोबत, हे कारण देत…
धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचा व्हिडिओ पाहून झाले दिग्गज क्रिकेटपटू हैराण
ट्रेंडिंग लेख –
रोहितच्या त्या दोन खेळी, ज्यात चाहत्यांनी पाहिली होती फक्त आणि फक्त षटकारांची बरसात
क्रिकेटला रामराम केल्यावर मॅनेजमेंटची डिग्री घेऊन अमेरिकन एक्सप्रेससाठी काम करणारा क्रिकेटर
आचरेकर सर म्हणत, “प्रवीण हा सचिनपेक्षा काकणभर सरस आहे”






