---Advertisement---

तीन वर्षांपूर्वी खास धोनीला खेळताना पाहण्यासाठी यायचा स्टेडियममध्ये; त्यानेच केली दांडी गुल

On: गुरूवार, ऑक्टोबर 8, 2020 11:34 PM
---Advertisement---

नवी दिल्ली। आयपीएल २०२० चा २१ वा सामना बुधवारी (७ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नई संघाला १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा चेन्नईचा या हंगामातील चौथा पराभव होता. असे असले तरीही धोनीची युवा गोलंदाजाने महत्त्वपूर्ण विकेट घेतली.

धोनीची विकेट घेणे वरुणचे होते स्वप्न

वरुण चक्रवर्तीसाठी धोनीविरुद्ध खेळणे खूप मोठी गोष्ट होती. आणि त्याची विकेट घेणे हे तर त्याच्या ‘स्वप्ना’प्रमाणे होते. कारण मागील तीन वर्षांपूर्वी तो चेपॉकच्या स्टँडमध्ये बसून धोनीला खेळताना पाहत होता. वरुणसाठी विश्वचषक विजेता धोनीसोबत आपला फोटो घेण्यासाठी आयपीएलमध्ये एक यादगार दिवस ठरला.

३ वर्षांपूर्वी चेपॉकमध्ये पाहायचा धोनीची फलंदाजी

वरुणने आयपीएल टी२० डॉट कॉमशी बोलताना राहुल त्रिपाठीला म्हटले की, “तीन वर्षांपूर्वी मी चेपॉक स्टँडमध्ये यायचो आणि प्रेक्षकांसोबत बसायचो. मी केवळ धोनीला फलंदाजी करताना पाहण्यासाठी यायचो. आता मी त्यांच्याविरुद्ध गोलंदाजी केली. हे माझ्यासाठी स्वप्नपूर्ती क्षण होता.”

तमिळनाडूच्या २९ वर्षीय फिरकीपटूने धोनीच्या दीर्घ खेळी खेळण्याच्या अपेक्षेवर पाणी फेरले. तो पुढे म्हणाला, “आजची खेळपट्टी खूप सपाट होती. मला वाटले की, ही १८० धावांची विकेट होती. माही भाई चांगली खेळी करत होते. मला वाटले की, जर मी योग्य लेंथवर चेंडू टाकला, तर मला त्यांचा विकेट घेण्याची संधी मिळू शकते.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “आणि मी हे करू शकलो. सामन्यानंतर मी धोनी सरसोबत फोटोही घेतला.”

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---