अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर शनिवारी (३ ऑक्टोबर) आयपीएल २०२०चा १५वा सामना पार पडला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात हा सामना झाला. बेंगलोरने ८ विकेट्सने हा सामना खिशात घालत हंगामातील सलग दूसरा विजय नोंदवला. दरम्यान बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
झाले असे की, राजस्थान संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकत सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने २० षटकात ६ विकेट्स गमावत १५४ धावांचा स्कोर उभारला. प्रत्युरात बेंगलोर संघाने १९.१ षटकात २ विकेट्स गमावत राजस्थानचे लक्ष्य गाठले.
दरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला विराट दमदार फॉर्ममध्ये दिसून आला. त्याने पहिल्याच षटकापासून दमदार फटकेबाजी करत ५३ चेंडूत ७२ धावा ठोकल्या. यात त्याच्या ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. यासह विराटने आयपीएलमधील त्याच्या ५५०० धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे हा पराक्रम करणारा तो आयपीएल इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
२००८ साली आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या विराटने त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वाधिक ८२५ धावा केल्या आहेत. तर कोची टस्कर्स केरळविरुद्ध सर्वात कमी ५० धावा लगावल्या आहेत.
Kohli 1st batsman to 5500 runs in IPL
825 vs DD
747 vs CSK
674 vs KKR
633 vs KXIP
628 vs MI
518 vs SRH
439 vs RR
306 vs DC
283 vs GL
271 vs RPSG
128 vs PWI
050 vs KTK5502 Total#IPL2020#Dream11IPL#Dream11IPL2020#RCBvRR
— Vidhu Pal (@vidhu_pal) October 3, 2020
आयपीएलमध्ये हा मोठा किर्तीमान नोंदवल्यामुळे सोशल मीडियाद्वारे अनेकांनी विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. यात ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकरचाही समावेश आहे.
Can’t keep a legend down…@imVkohli becomes the first player in @IPL history to score 5500 runs 👏🏽👏🏽👏🏽
— Lisa Sthalekar (@sthalekar93) October 3, 2020
लिसाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत लिहिले आहे की, “एक दिग्गज जास्त काळ मागे राहू शकत नाही. विराट कोहली आयपीएल इतिहासात ५५०० धावा करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
अर्धशतक किंग! २० वर्षीय पडिक्कलने ‘या’ दिग्गजांना मागे टाकत मिळवली आघाडी, पाहा काय केलाय पराक्रम
आरबीचीचे ५ महारथी, ज्यांनी आयपीएलच्या हंगामातील पहिल्या ४ डावात कुटल्यात सर्वाधिक धावा
फ्रेंच ओपन: पुरुष एकेरीत डोमिनिक थिमने तर महिला एकेरीत सिमोना हालेपने मिळवला विजय
ट्रेंडिंग लेख-
अनुभवी खेळाडूंचा भरणा असणाऱ्या चेन्नईला लोळवणारा १९ वर्षांचा पोरगा, वाचा ‘त्याच्या’ संघर्षाची कहानी
आतापर्यंत आयपीएल २०२०मध्ये गोलंदाजांना धू धू धुणारे टॉप-१० फलंदाज, केल्यात सर्वाधिक धावा
तुम्हाला माहितीये? ‘स्विंग का सुलतान’ असा लौकिक असलेल्या ‘या’ खेळाडूला धोनीनेच दिली होती संधी