---Advertisement---

थेट ऊसाच्या फडात जुंपली रोहित- धोनी फॅन्समध्ये हाणामारी, पोस्टर फाडल्याने झाला वाद

On: मंगळवार, ऑगस्ट 25, 2020 10:49 AM
---Advertisement---

मुंबई । आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघांपैकी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा समावेश आहे. या दोन्ही संघांतील कर्णधाराचे चाहते देखील काही कमी नाहीत. तथापि, बऱ्याच वेळा चाहते त्यांच्या संघासाठी एकमेकांशी भांडतात. जेव्हा सोशल मिडीयाऐवजी समोरासमोर असे संघर्ष होऊ लागतात तेव्हा ही परिस्थिती आणखी भयंकर बनते. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांमध्ये जे वाद होतात, तसे वाद सहसा इतर संघातील चाहत्यांमध्ये दिसत नाहीत. त्याचमुळे अनेक वेळा मुंबई व चेन्नईच्या चाहत्यांमध्ये भांडणं झाल्याचे वृत्त दरवर्षी येत असतात.

अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे शनिवारी झाली. एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्या चाहत्यामध्ये भांडण झाले. हे भांडण इतके वाढले की एका चाहत्याने उसाच्या शेतात नेऊन एकाला मारहाण केली. भारतीय कर्णधार वीरेंद्र सेहवागने ही बातमी वाचून आश्चर्य व्यक्त केले आणि त्या चाहत्यांना वेडे म्हटले आहे.

वास्तविक, दोन्ही खेळाडूंचे चाहते त्यांच्या संबंधित खेळाडूंचे पोस्टरसह रस्त्यावर फिरत होते. धोनीचे चाहते त्याच्या निवृत्तीमुळे तर रोहितच्या चाहते त्याची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाल्याने रस्त्यावर आले होते. दरम्यान, काही अज्ञात लोकांनी रोहित शर्माचे पोस्टर्स फाडले. त्यानंतर दोन्ही चाहते आपसात भिडले. दरम्यान, एका चाहत्याने शेतात जाऊन दुसऱ्याला जोरदार मारहाण केली.

सेहवागने चाहत्यांना दिला सल्ला

माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने या बातमीच‍ा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले की, “तुम्ही काय वेडापणा करता. खेळाडू एकमेकांचा खूपच आदर करतात. ते जास्त बोलत नाही. फक्त कामाशी मतलब ठेवतात. पण काही चाहते खूपच वेड्यासारखे वागतात. भांडणे करू नका. भारतीय संघाला एक संघ म्हणून लक्षात ठेवा.”

आयपीएल खेळण्यासाठी दोन्ही संघ युएईमध्ये आहेत. मुंबई इंडियन्सने रोहितच्या नेतृत्वात चार वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे, तर एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज तीन वेळा चॅम्पियन बनली आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. गेल्या हंगामातही अंतिम सामना या दोघांमध्ये  झाला होता, त्यावेळी मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---