---Advertisement---

‘डिविलियर्सने यष्टीरक्षण केल्यामुळे आमचा संघ संतुलित…’, एबीची कामगिरी पाहून वॉशिंग्टन सुंदरने व्यक्त केले मत

On: बुधवार, सप्टेंबर 30, 2020 7:29 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर हा आपला संघसहकारी एबी डिविलियर्सच्या कामगिरीमुळे खूप प्रभावित झाला आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, दक्षिण आफ्रिकाच्या या आक्रमक फलंदाजाच्या यष्टीरक्षकणासोबत इतर अनेक गोष्टी करण्याच्या क्षमतेमुळे बेंगलोर संघ संतुलित झाला आहे.

सोमवारी (२८ सप्टेंबर) बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात आयपीएल २०२०चा दहावा सामना पार पडला. हा सामना बेंगलोर संघाने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. दरम्यान खराब फॉर्ममध्ये असलेल्या यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिपच्या जागी डिविलियर्सने या सामन्यात बेंगलोरच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. एवढेच नव्हे तर, या धुरंधरने फलंदाजी करताना २४ चेंडूत ५५ धावांची तूफानी खेळीदेखील केली होती.

डिविलियर्सच्या या दमदार प्रदर्शनाला पाहिल्यानंतर सुंदर म्हणाला की, “मी खूप चकित झालो आहे. कारण मला तर नाही वाटत की, जगात असे कोणते काम असेल जे डिविलियर्स करु शकत नाही. मला एक अशी गोष्ट सांगा जी डिविलियर्स करु शकत नाही. संघाला त्याच्याकडून ज्या अपेक्षा असतात, त्या तो पूर्ण करतो. बेंगलोर संघासाठी तो गेल्या कित्येक वर्षांपासून हव्या त्या गोष्टी करत आहे, याचाच त्याला खूप आनंद वाटतो.”

“डिविलियर्सने यष्टीरक्षण केल्यामुळे आमचा संघ संतुलित तर होतोच. त्याबरोबर गोलंदाजांनाही मदत मिळते. यामुळे संघासाठी सोईस्कर परिस्थिती निर्माण होते,” असे पुढे बोलताना सुंदरने म्हटले.

थोडक्यात सांगायचं झालं तर, ज्याप्रकारे चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी हा फलंदाजी आणि यष्टीरक्षण या दोन्ही विभागातही दमदार कामगिरी करतो. त्याच्या याच गोष्टीमुळे त्याच्या संघात संतुलन निर्माण होते. अगदी त्याचप्रमाणे डिविलियर्सही बेंगलोर संघासाठी कामगिरी करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---