मुंबई । याच वर्षी झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताचा कसोटी मालिकेत 2-0 अशा फरकाने पराभूत झाला. कसोटी आणि वनडे मालिकेतल्या पराभवाला भारतीय फलंदाजी जबाबदार आहे. कसोटी मालिकेपूर्वी टी 20 आणि वनडे मालिकेत सलामीला खेळताना केएल राहुल याने आपल्या दमदार खेळीने प्रभावित केले होते. मात्र त्याला कसोटी मालिकेत संधी देण्यात आली नाही.
दरम्यान, भारताचा माजी खेळाडू वसीम जाफर याने केएल राहुलचे कौतुक करताना म्हणाला की, “त्याला न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघात स्थान मिळायला हवे होते. तो भारतीय संघाकडून दीर्घकाळ कसोटी क्रिकेट खेळू शकतो. ”
वसीम जाफर आकाश चोप्रा शी एका यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “न्यूझीलंड दौऱ्यात झालेल्या कसोटी सामन्यात राहुलला संधी मिळणे आवश्यक होते. त्याने ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दौऱ्यात शतके ठोकली आहेत.”
वसिम जाफर म्हणाला, ” राहुल द्रविड जबरदस्त खेळाडू आहे. यात कोणतीच शंका नाही. रोहित शर्मा विराट कोहली यांच्यानंतर माझा तो आवडता खेळाडू आहे. मला वाटते की, निवड समितीने जास्तीत जास्त संधी द्यायला हवी. भारताचा कडून तो दीर्घ काळ क्रिकेट खेळू शकतो.”
“जर एखादा खेळाडू वनडे आणि टी 20 मध्ये कामगिरीत सातत्य दाखवत असेल, तर त्याला त्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. एक दीड वर्षांपूर्वी तो काय करत होता याचा विचार करू नका. मात्र, न्यूझीलंड दौऱ्यात त्याला तिसरा सलामीचा फलंदाज म्हणून संघात सामील करणे आवश्यक होते. त्यांच्याजवळ गेम आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळू शकतो. तो संघात राहिल्यास इतर सलामीच्या फलंदाजांवर दबाव देखील टाकू शकतो. मला वाटते तो लंबी रेसचा घोडा आहे,” असे वसीम जाफरने सांगितले.