क्रिकेटच्या घडामोडीची माहिती देणारे प्रसिद्ध मासिक विस्डेनने आयसीसीच्या सर्वकालीन सर्वोत्तम रँकिंगच्या आधारे सर्वोत्तम ११ जणांचा वनडे संघ निवडला. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा यामध्ये समावेश करण्यात आला नाही. या संघाचे कर्णधारपद माजी दिग्गज भारतीय कर्णधार कपिल देव यांच्याकडे सोपवले आहे.
क्रिकेटमधील ‘बायबल’ समजल्या जाणाऱ्या विजडनने वनडे क्रिकेट इतिहासात आयसीसी क्रमवारीत सर्वोत्तम गुण घेणाऱ्या खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सर्वाधिक वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या, सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक शतके ठोकणारा सचिनचा या संघात समावेश नाही.
या संघात वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज खेळाडू सर विवियन रिचर्ड्स 935 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. सोबतच 918 गुणांसह ऑस्ट्रेलियाचे डीन जोन्स यांच्याबरोबर त्यांची सलामीला निवड केली आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघाचे झहीर अब्बास 931 गुणांसह तिसऱ्या, ऑस्ट्रेलियाचे ग्रेग चॅपेल 921 गुणांसह चौथ्या आणि इंग्लंडचे डेविड गॉवर 919 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.
यासोबतच 902 गुण असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि ‘मिस्टर 360’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्सला या संघात यष्टीरक्षक म्हणून निवडले आहे. दुसरीकडे सचिनचे आयसीसी क्रमवारीतील कमी गुण त्याला संघात स्थान न देण्यास कारणीभूत ठरले आहेत. 1983 साली भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांचे अष्टपैलू गटात सर्वाधिक गुण होते. 22 मार्च, 1985 मध्ये अष्टपैलू गटात 631 गुण मिळवत कपिल यांनी प्रथम स्थान मिळविले होते. विशेष म्हणजे या संघात स्थान मिळवणारे कपिल देव हे एकमेव भारतीय खेळाडू आहेत.
याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा शाॅन पोलॉक (917 गुण), न्यूझीलंडचे रिचर्ड हेडली (923 गुण), वेस्ट इंडिजचे जोएल गार्नर (940 गुण) आणि श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (913 गुण) यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.
असा आहे विजडनचा वन डे संघ-
कपिल देव (कर्णधार) विवियन रिचर्ड्स, डिन जोन्स, जहीर अब्बास, ग्रेग चॅपल, डेविड गॉवर, एबी डिविलियर्स, शाॅन पोलॉक, रिचर्ड हेडली, जॉईल गार्नर, मुथय्या मुरलीधरन
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॉक्सिंग डे’ कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
मोठी बातमी! भारताला जोरदार धक्का, रवींद्र जडेजा झाला दुखापतग्रस्त
‘नवरा दुखापतीने त्रस्त, बायको दुसऱ्या क्रिकेटपटूसोबत पार्टी करण्यात व्यस्त’