मुंबई । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने 2007 साली झालेल्या टी-20 विश्वचषक आणि 2011च्या विश्वचषकात ऐतिहासिक खेळी साकारली होती. भारताला दोनदा चॅम्पियन बनविण्यात युवराजचा सिंहाचा वाटा उचलला होता. 2002 साली इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातली त्याची अर्धशतकी खेळी क्रिकेटप्रेमींच्या मनात आजही घर करून आहे.
युवराज सिंग सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असतो. चित्त्यासारखे चपळ क्षेत्ररक्षण करणार्या युवीने सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये युवराज सिंगबरोबर वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ, दिनेश मोंगिया, लक्ष्मण आणि टिनू योहाना दिसत आहेत. या फोटोत कर्णधार सौरव गांगुली दिसत नसला तरी त्याने हा फोटो कधीचा आहे हे सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी युवराजने आशिष नेहरा, वीरेंद्र सेहवाग, वीवीएस लक्ष्मण हे टेलिफोन बूथवर फोनवर बोलत असतानाचा फोटो शेअर केला होता. युवराजने शनिवारी जो फोटो शेअर केला आहे त्या फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ब्लास्ट फ्रॉम द पास्ट, जवानीतले दिवस. दिनेश हरभजन सिंग, वीवीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, हा कोणता दौरा होता? या फोटोवर गांगुलीने कमेंट केले की, “युवराज सिंग आहे ! खूपच तरुण दिसत आहे. असे वाटते की, हा 2000 सालचा इंग्लंड दौरा आहे. किती ऐतिहासिक दौरा हा. ”
https://www.instagram.com/p/CBYeJ5EjhwG/
नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये कर्णधार सौरव गांगुली याने टी-शर्ट काढून विजयाचा आनंद साजरा केला होता.
युवराज सिंगने भारताकडून 40 कसोटी, 304 वनडे आणि 58 टी-20 सामने खेळला आहे. यात कसोटी वनडे आणि टी-20 मध्ये अनुक्रमे 1900, 8701 व 1177 धावांची नोंद त्याच्या नावावर आहे. यासोबतच त्याने कसोटी, वनडे, टी-20 मध्ये अनुक्रमे 9, 111 आणि 28 गडी देखील बाद केले आहेत.