भारतीय संघाने 28 वर्षानंतर 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात वनडे विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या टीकाकारांना शांत केले. भारतीय संघाने पुन्हा एकदा वनडे क्रिकेट प्रकारात आपला दबदबा सिद्ध केला आहे. या विश्वचषक विजेत्या अनेक खेळाडूंना नायक म्हणलं जातं. ज्यामध्ये युवराज सिंग, धोनी, गौतम गंभीर, झहीर खान या खेळाडूंचा समावेश आहे. पण असेही काही खेळाडू होते, ज्यांनी देखील खूप चांगले काम केले होते. पण त्यांचे हे योगदान कोणाला आठवत नाही.
आज आपण या लेखात 2011 विश्वचषक विजेत्या नायकांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांना त्या विजयाचे नायक म्हटले जात नाही. आणि त्यांच्या योगदानाला फारसे महत्त्वही मिळत नाही किंवा त्याची फारसी चर्चाही होतं नाही. त्यातील काही योगदानही अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी आली होती.
2011 विश्वचषकातील 6 नायक खेळाडू- 6 Unsung Hero of World Cup 2011
6. आर अश्विन
फिरकीपटू आर अश्विनदेखील (R Ashwin) त्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग होता. जेथे तो संघाचा तिसरा फिरकीपटू म्हणून खेळत होता. या खेळाडूला जास्त श्रेय मिळत नाही. परंतु, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात त्याचे योगदान खूप महत्वाचे होते. अश्विनने त्या विश्वचषकात फक्त 2 सामने खेळले. परंतु, त्यामध्ये त्याने 23.25 च्या प्रभावी सरासरीने 4 विकेट्स घेतले होते. दरम्यान, त्याने केवळ 4.65 च्या इकॉनॉमी व 30 च्या गोलंदाजी स्ट्राईक रेटने धावा दिल्या होत्या. त्याने क्षेत्ररक्षणही चांगले केले होते.
तरीही अश्विनला श्रेय दिले जात नाही. पण उपांत्य फेरी गाठण्यात या खेळाडूचे महत्त्वपूर्ण योगदान होते. पण आजही हा खेळाडू विश्वचषक 2011 च्या विजयाचा नायक मानला जात नाही.
5. मुनाफ पटेल
मध्यमगती गोलंदाज मुनाफ पटेलदेखील (Munaf Patel) त्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग होता. जेथे तो आघाडीचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून खेळत होता. या खेळाडूला जास्त श्रेय मिळत नाही. परंतु, पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याचे योगदान खूप महत्वाचे होते.
त्या विश्वचषकात मुनाफ केवळ 8 सामने खेळला. पण ज्यामध्ये त्याने 32.09 च्या प्रभावी सरासरीने 11 बळी घेतले. दरम्यान, त्याने केवळ 5.36 च्या इकॉनॉमी व 35.09 च्या गोलंदाजी स्ट्राईक रेटने धावा दिल्या होत्या. आणि महत्त्वाच्या प्रसंगी मुनाफने विकेट्स ही घेतल्या. तरीही मुनाफला जास्त श्रेय मिळत नाही. परंतु संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ज्यामुळे संघाने विजेतेपद आपल्या नावावर केले होते. मुनाफने आपल्या गोलंदाजीच्या विविधतेने त्यावेळीच्या सर्व फलंदाजांना अडचणीत टाकले होते.
4. सुरेश रैना
भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) हादेखील त्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग होता. जेथे तो तळात फलंदाजी करताना दिसला. या खेळाडूला जास्त श्रेय मिळत नाही. परंतु, पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याचे योगदान खूप महत्वाचे होते.
त्या विश्वचषकात रैना 4 सामने खेळला होता. ज्यामध्ये त्याने 74 च्या उत्कृष्ट सरासरीने व 98.66 च्या स्ट्राइक रेटने 74 धावा केल्या होत्या. त्यापैकी त्याची नाबाद 36 सर्वोत्तम धावसंख्या होती. रैनाने थोड्या पण महत्त्वपूर्ण धावा केल्या होत्या.
पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत रैनाने युवराज सिंगला (Yuvraj Singh) शेवटपर्यंत साथ दिली, तर पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने महत्वपूर्ण धावा केल्या. आणि भारताला सन्मानपूर्वक धावसंख्या उभी करून दिली. यामुळे संघाने विश्वचषक 2011 च्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास सहजपणे पार केला होता.
3. हरभजन सिंग
भारतीय संघात प्रमुख फिरकीपटू म्हणून भूमिका निभावणारा हरभजन सिंगला (Harbhajan Singh) 2011 च्या विश्वचषकातील विजयाचे श्रेयही दिले जात नाही. त्याने फिरकी आक्रमकतेची जबाबदारी उत्तम प्रकारे हाताळली होती. तरीही या खेळाडूला जास्त श्रेय मिळत नाही. परंतु पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याचे योगदान खूप महत्वाचे होते.
त्या विश्वचषकात हरभजनने 9 सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याने 43.33 च्या सरासरीने 9 विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान, त्याने केवळ 4.48 च्या इकॉनॉमी व 58 च्या स्ट्राइक रेटने धावा दिल्या होत्या. अत्यंत महत्वाच्या वेळी त्याने या विकेट्सही घेतल्या होत्या.
पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भज्जीने शाहिद आफ्रिदी आणि उमर अकमल यांच्यासारख्या महत्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या. त्याशिवाय फलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचे कामही त्याने केले होते. जे यशाचे एक कारणदेखील होते.
2. विरेंद्र सेहवाग
सलामीवीर आणि आक्रमक शैलीत खेळणाऱ्या विरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) 2011 च्या विश्वचषकातील विजयाचे श्रेय दिले जात नाही. डावाच्या सुरूवातीला सेहवाग आक्रमक खेळताना दिसला होता. पहिल्या सामन्यातच सेहवागने अतिशय शानदार शतकी खेळी केली होती. जी कायम आठवणीत राहील. त्या विश्वचषकात सेहवागने 8 सामने खेळले होते.
ज्यामध्ये त्याने 47.50 च्या सरासरीने 1 शतक आणि 1 अर्धशतकाच्या मदतीने 380 धावा केल्या होत्या. दरम्यान, त्याचा स्ट्राइक रेट 122.58 होता, तर त्याची 175 सर्वोत्तम धावसंख्या होती. सेहवागने पाकिस्तानविरूद्ध लहान पण महत्त्वाची आणि आक्रमक खेळी करत वेगवान सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विश्वचषक 2011 विजयाच्या नायकांच्या यादीत सेहवागही आला नाही. सेहवागने खेळाडूने खूप महत्वाची भूमिका निभावली होती.
1. विराट कोहली
अनेक जणांनी विराटने आयसीसी ट्रॉफी न जिंकलेला कर्णधार म्हणून ट्रोलही केले असेल. पण विराट 2011 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा एक भाग होता. विराटने या विश्वचषकात भारताच्या पहिल्याच सामन्यात म्हणजे बांगलादेशविरुद्ध शतक केले होते. पण त्यावेळी सेहवागने 175 धावा केल्या असल्याने विराटचे शतक कुठेतरी झाकोळले गेले.
इतकंच नाही, तर विराटने श्रीलंकेविरुद्ध फायनलमध्ये गंभीरबरोबर 83 धावांची भागीदारी केली होती. ज्यामुळे भारताच्या डावाला स्थिरता मिळाली होती. पुढे धोनी आणि गंभीरच्या अर्धशतकांनी भारताला या विश्वचषकात विजय मिळवून दिला. विराटने या विश्वचषकात 9 सामने खेळले होते आणि 282 धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग लेख-
-बापरे! ८०पेक्षा जास्त सामने खेळून आयपीएलमध्ये एकही चौकार मारता न आलेले क्रिकेटर
-ते दोन चांगले निर्णय झाले नसते तर जगाला दोन दिग्गज सलामीवीर मिळाले नसते
-आख्ख्या पिढीला वेड्यात काढलेल्या क्रिकेटमधील काही मजेशीर अफवा