क्रिकेटमध्ये विश्वचषक ही सर्वात मानाची स्पर्धा मानली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसी पुरुषांच्या ज्या तीन महत्त्वाच्या स्पर्धा आयोजीत करते त्यातील 50 षटकांचा क्रिकेट विश्वचषक सर्वात महत्त्वाचा. त्यामुळे विश्वचषकाच्या ट्रॉफीला प्रचंड महत्त्व आहे. अनेकदा विजयी संघांना दिलेली ट्रॉफी खरी की खोटी यावरुन चर्चा झाल्या आहेत. तसेच या ट्रॉफीला काय इतिहास आहे? या ट्रॉफीमध्ये असणाऱ्या घटकांचा अर्थ काय, असे अनेक प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडत असावेत. या विश्वचषकाच्या ट्रॉफीबद्दलच्या अशा अनेक प्रश्नांचा या लेखात आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विश्वचषकाच्या ट्रॉफीचा प्रवास –
आत्तापर्यंत क्रिकेट विश्वचषकाची ट्रॉफी 5 वेळा बदलण्यात आली आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेला 1975 ला सुरुवात झाली. तेव्हापासून ते 1996 पर्यंतच्या विश्वचषक स्पर्धांना मुख्य प्रायोजकांचे नाव देण्यात आले होते. तसेच त्यांच्याच नावाने ४ वेगवेगळे चषकही या दरम्यान देण्यात आले. 1975, 1979 आणि 1983 या 3 विश्वचषक स्पर्धेला प्रुडेन्शिअल कप हे नाव होते. तसेच त्या नावाने या विश्वचषक विजेत्या संघांना चषक देण्यात आले होते. 1975 आणि 1979 ला वेस्ट इंडिजने प्रुडेन्शिअल कप जिंकला तर 1983 ला भारतीय संघाला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळाले.
भारताने जिंकलेली ही ट्राॅफी सध्या लाॅर्ड्स येथील संग्राहायलयात आहे. ही ट्राॅफी विश्वचषकापुर्वी अन्य कोणत्यातरी खेळाच्या स्पर्धेत वापरल्याचेही काही माध्यमांनी तेव्हा म्हटले होते. त्यानंतर 1983च्या ट्राॅफीची प्रतिकृती भारताला देण्यात आली व खरी ट्राॅफी ही भारतात संघाचे स्वागत व मिरवणुक झाल्यानंतर काही दिवसांनी लंडनला परत पाठविण्यात आली. 1983 व 2011 विश्वचषकाच्या दोन्ही ट्राॅफी सध्या बीसीसीआयचे मुख्यालय असलेल्या वानखेडे स्टेडियमवर आहेत.
The BCCI would like to thank Mr Jayant Zaveri, Mr B Laxman, Mr Sitaram Tambe and Dr Vece Paes for their invaluable contribution to the organisation and wish them a joyous retirement. pic.twitter.com/8nENnFB81M
— BCCI (@BCCI) December 29, 2017
पुणेस्थित छायाचित्रकार संजय झिंजाड जेव्हा लाॅर्ड्स मैदानावर गेले होते तेव्हा 1983 च्या भारताच्या विश्वविजयाची ट्राॅफी पाहताना त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ते म्हणातात, “मी जेव्हा 2015 साली लाॅर्ड्सवर गेलो होतो, तेव्हा मी संग्रहायलय पाहायला आवर्जुन गेलो होतो. आमचा अंदाजे 20-22 लोकांचा ग्रुप होता व गाईडने जेव्हा आम्हाला म्हटले की ‘जे- जे भारतीय आहेत ते पुढे या, ही ट्राॅफी कपिलने 1983ला विश्वचषक जिंकल्यावर हातात घेतलेली खरीखुरी ट्राॅफी आहे. तेव्हा गहिवरुन आलं होतं. भारतीय संघाने 1983 साली केलेली कमाल त्या ट्राॅफीच्या रुपात 30-32 वर्षांनी पाहतानाच्या भावना काही वेगळ्याच होत्या.’
त्यानंतर 1987, 1992 आणि 1996 ला या तिन्ही वर्षी वेगवगेळ्या 3 ट्रॉफी देण्यात आल्या. 1987 ला ऑस्ट्रेलियाने रिलायंन्स कप जिंकला. तर 1992 ला बेन्सन अँड हेजेस ट्रॉफी पाकिस्तानने मिळवली आणि 1996 ला विल्स कप श्रीलंकेने जिंकला. 1999 च्या विश्वचषकाआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कायमस्वरुपी एक ट्रॉफी तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आत्ताची नवीन आयसीसी विश्वचषकाची ट्रॉफी अस्तित्वात आली. सर्वात पहिल्यांदा ही ट्रॉफी 1999 च्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला देण्यात आली.
विश्वचषक ट्राॅफीची रचना –
सध्या विश्वविजेत्या संघांना देण्यात आलेल्या विश्वचषक ट्रॉफीची रचना लंडनमधील गॅरार्ड अँड कंपनीच्या पॉल मार्सडेन यांनी केली होती. नंतर या ट्रॉफीला सध्याचा आकार देण्याचे काम ट्रॉफी संचालक स्टिव्हन ऑटविल आणि डिझाइन व्यवस्थापक झोए क्लार्क यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
Ahead of the #CWCTrophyTour, we're learning about how the @cricketworldcup trophy was made.
Meet David Bedford, the man who engraved the trophy. He talks us through an art that allows no room for error. pic.twitter.com/GODCqGygHN
— ICC (@ICC) August 21, 2018
ही ट्रॉफी 11 किलोग्रॅम वजनाची असून 65 सेंटिमीटर उंच आहे. जागतिक दर्जाच्या स्पर्धेदरम्यान दिल्या जाणाऱ्या उंच ट्रॉफींमध्ये आयसीसीच्या या नवीन विश्वचषकाच्या ट्रॉफीची गणना होते. ही ट्रॉफी चांदी आणि सोन्याने बनवण्यात आली आहे. त्यात विविध घटक आहे. या ट्रॉफीच्या वरचा सोनेरी गोल हा क्रिकेट बॉलचा आणि पृथ्वीचा म्हणजेच जगाचा विचार करुन तयार करण्यात आला आहे. त्यावर जगाच्या नकाशाबरोबरच क्रिकेट बॉलवर असणारी शिवण कोरण्यात आली आहे. ज्याचा अर्थ ही जागतिक स्पर्धा आहे, असा थोडक्यात लागतो.
How do you actually make a trophy like the @cricketworldcup?
Ahead of the #CWCTrophyTour, here's a peek into its manufacture! 🏆 pic.twitter.com/M7QYWmrYm8
— ICC (@ICC) August 22, 2018
तसेच हा गोल तीन स्तंभांच्या वरच्या बाजूला आहे. चंदेरी रंगाचे तीन स्तंभ क्रिकेट स्टम्प आणि बेल्सच्या आकारामध्ये आहे. तसेच ते तीन स्तंभ क्रिकेटच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीन मुलभुत बाबींचे प्रतिनिधित्व करतात. तसेच त्याखाली लाकडी पाया (हार्डवुड) आहे ज्यावर विजेत्यांची नावे कोरलेली असतात.
What goes into the design of an iconic trophy like the ICC Cricket World Cup?
Ahead of the #CWCTrophyTour, we asked the team who made it!
▶️ https://t.co/RipOnE3pKG pic.twitter.com/2WwLdNaYcl
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) August 19, 2018
कुठे ठेवली जाते ही ट्रॉफी –
या विश्वचषकाची खरी ट्रॉफी संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या आयसीसीच्या मुख्यालयात ठेवलेली आहे. विश्वचषक विजेते संघ मायदेशी परत जाताना या ट्रॉफीची प्रतिकृती घेऊन जातात आणि खरी ट्रॉफी पुन्हा आयसीसीच्या मुख्यालयात स्पर्धा संपल्यावर ठेवून दिली जाते.
विश्वचषकाच्या खऱ्या ट्रॉफीमध्ये आणि प्रतिकृतीमध्ये खूप छोटा फरक आहेे. त्यामुळे पहिल्यांदा पहाताना कोणती खरी आणि कोणती प्रतिकृती आहे हे पटकन ओळखता येत नाही. खऱ्या ट्रॉफीवरील स्तंभांच्या आतील बाजूस आयसीसीचा लोगो कोरलेला आहे आणि प्रतिकृतींमध्ये त्या त्या विश्वचषक स्पर्धेचा लोगो स्तंभांच्या आतील बाजूस आहेत.
खऱ्या ट्राॅफीवर आजपर्यंतच्या विजेत्या संघाची नावे आहे. तर प्रतिकृतीवर जो संघ जिंकेल त्यावर्षी फक्त त्याचं नावं असतं. याव्यतिरिक्त मोठा फरक खऱ्या ट्रॉफी आणि प्रतीकृतीमध्ये नाही. त्यामुळे अनेकदा विजेत्या संघाला खरी की खोटी ट्रॉफी मिळाली म्हणून चर्चा होत असतात. 2011 विश्वचषकावेळीही अशाच चर्चा झाल्या होत्या. साल 1999 ला ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकल्यानंतर खरी ट्रॉफी उचलली होती. पण मायदेशी परत जाताना या ट्रॉफीची प्रतिकृती नेली होती. ज्यावर 1999 च्या विश्वचषकाचा लोगो आणि ट्रॉफीच्या बेसला एक गोल आहे.
तथापि, 2003 ला ऑस्ट्रेलिया जी ट्रॉफी मायदेशी घरी घेऊन गेले ती अगदी खऱ्या ट्रॉफीसारखी होती. त्याचमुळे ज्यावेळी 2003 चा विश्वचषक जिंकला तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने खरी ट्रॉफी उचलली होती की प्रतिकृती हे कोणालाही पटकन सांगला आले नाही. साल 2007 ला जेव्हा सलग ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या विश्वचषक जिंकला तेव्हा त्यांनी विश्वचषकाची प्रतिकृती उंचावली होती, ज्यावर खाली बेसला एक गोल होता. पण स्तंभाच्या आतल्या बाजूला स्पर्धेचा लोगो नव्हता.
2011 ला जेव्हा एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यावर जी ट्रॉफी उंचावली तिचा बेस रिकामा होता, त्यावर कोणताही गोल नसल्याने ती खोटी ट्रॉफी असल्याची चर्चा झाली होती. त्यावेळी अनेक प्रमोशनल इव्हेंट्स आणि ट्रॉफी टूर दरम्यान दाखवण्यात आलेली ट्रॉफी कर न भरल्याच्या कारणामुळे मुंबई विमानतळाच्या कस्टम विभागाच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला होता.
याला आयसीसीने पुढे पृष्टी देताना म्हटले होते की मुंबईला विजेत्या भारताला दिलेली ट्राॅफी ही प्रतिकृती आहेत, तर कस्टमने पकडलेली ट्राॅफी ही प्रोमोशनल इव्हेंटासाठी तयार करण्यात आलेली ट्राॅफी होती. परंतु तेव्हा माध्यमांमधील आलेल्या अनेक वृत्तांनुसार खरी ट्राॅफी हीच कस्टम विभागाने पकडली होती व इंपोर्ट ड्युटीमधून या ट्राॅफीला सुट देण्यात येणार नव्हती.
साल 2015 च्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने जी ट्रॉफी विश्वचषक जिंकल्यावर उंचावली त्या ट्रॉफीच्या बेसला एक गोल होता तसेच स्पर्धेचा लोगो कोरलेला होता. 2019 च्या विश्वचषक विजेत्या इंग्लंडनेही उंचावलेल्या ट्रॉफीच्या बेसला एक गोल होता तसेच स्पर्धेचा लोगो कोरलेला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीला धूळ चारल्यानंतर राहुल आपल्या खेळाडूंवर भलताच खुश! काय म्हणाला पाहाच
BREAKING । दिग्गज भारतीय अष्टपैलू काळाच्या पडद्याआड, जानेवारीत झालेली मोठी शस्त्रक्रिया