---Advertisement---

एका बाउन्सरने घेतला जीव, आजच्याच दिवशी घडली होती क्रिकेट इतिहासातील सर्वात दु:खद घटना!

On: बुधवार, नोव्हेंबर 27, 2024 12:14 PM
---Advertisement---

क्रिकेट हा खूप रोमांचक खेळ आहे. मात्र कधी-कधी तो जीवघेणाही ठरतो. असं एक-दोनदा नव्हे, तर अनेक वेळा घडलं आहे. असंच काहीसं 10 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी दिवशी घडलं होतं. तो दिवस होता 27 नोव्हेंबर 2014. त्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा उगवता क्रिकेटपटू फिलिप ह्युजेस याचं निधन झालं होतं. मैदानावर फलंदाजी करताना ह्युजेसच्या डोक्याला चेंडू लागला होता.

वास्तविक, फिलिप ह्युजेस हा ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या शेफिल्ड शिल्ड या प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत खेळत होता. हा सामना दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यू साउथ वेल्स यांच्यात खेळला जात होता. तारीख होती 25 नोव्हेंबर 2014. दक्षिण ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत होता. न्यू साउथ वेल्सचा शॉन ॲबॉट 49वं षटक टाकण्यासाठी आला. पहिला चेंडू डॉट गेला. फिलिप ह्युजेसनं दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. मात्र तिसरा चेंडू त्याच्या आयुष्यातील शेवटचा चेंडू ठरला.

या वेळेपर्यंत फिलिप ह्युजेस चांगली फलंदाजी करत होता. तो 63 धावांवर नाबाद होता. दरम्यान, ॲबॉटनं एक बाउन्सर टाकला, जो या डाव्या हाताच्या फलंदाजाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागला. त्यावेळी हेल्मेटवर डोक्याच्या त्या भागाला संरक्षण दिलं जात नव्हतं. आता ते देण्यात येतंय. चेंडू लागल्यानंतर फिल जमिनीवर बेशुद्ध पडला आणि पुन्हा कधीही उठू शकला नाही. त्याला उपचारासाठी त्वरीत रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र दोन दिवसात त्याच्या मृत्यूची बातमी आली.

अशा प्रकारची ही पहिलीच घटना नव्हती. याआधीही विविध देशांच्या खेळाडूंना फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागून आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये भारतीय फलंदाज रमन लांबा याचा समावेश आहे. भारतासाठी चार कसोटी आणि 32 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या रमण लांबा याचा 1998 मध्ये ढाका येथे एका क्लब सामन्यात क्षेत्ररक्षण करताना डोक्याला चेंडू लागल्यानं मृत्यू झाला होता. फिलिप ह्यूजेसनं ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी, 25 एकदिवसीय आणि एक टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

हेही वाचा – 

मेगा लिलावात भारतानंतर कोणत्या देशाच्या खेळाडूंवर लागली सर्वाधिक बोली? या देशाचे खेळाडू रिकाम्या हातानं परतले
सचिन-सेहवागशी तुलना झालेला पृथ्वी शॉ लिलावात अनसोल्ड का राहिला? कारण जाणून घ्या
भारतीय संघाला मोठा धक्का! महत्त्वाचा फलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर होण्याची शक्यता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---