---Advertisement---

शतकांच्या शतकाचं इंजिन आज जोडलं गेलं होतं, याचदिवशी सचिनने केलं होतं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक

On: शनिवार, ऑगस्ट 14, 2021 3:40 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस म्हणजेच १४ ऑगस्ट हा खूपच खास आणि महत्त्वाचा आहे. कारण या दिवसापासूनच सचिनच्या १०० शतकांचा प्रवास सुरू झाला होता. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या (१५ ऑगस्टच्या) एकदिवस आधी सचिनने आपली ऐतिहासिक शतकी खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले हाते.

१४ ऑगस्ट १९९० साली सचिनने १७ वर्षे आणि ११२ दिवसांच्या वयात आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. त्याने मॅनचेस्टर येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात १८९ चेंडूंचा सामना करताना ११९ धावांची खेळी केली होती. या धावा करताना सचिनने १७ चौकार ठोकले होते.

सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ आणि वनडे क्रिकेटमध्ये ४९ शतके ठोकली आहेत. कसोटीत सचिनची सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद २४८ आहे. ही धावसंख्या त्याने २००४ मध्ये बांगलादेशविरुद्ध केली होती.

इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात भारतीय संघ कठीण परिस्थिती होता. दुसऱ्या डावात ४०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने १८३ धावसंख्येवर ६ विकेट्स गमावले होते. परंतु सचिनने (११९) आणि मनोज प्रभाकर (६७) यांच्या खेळीमुळे सामना अनिर्णत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

या खास शतकानंतर संघसहकारी संजय मांजरेकरांनी त्याला पांढरा शर्ट भेट म्हणून दिला होता. त्यामुळे तो खूप खुश झाला होता. त्याला सामनावीर म्हणून शँपेन मिळाली होती. परंतु सचिन १७ वर्षांचा होता आणि तो पीत नसल्यामुळे त्याने ती संघातील इतर खेळाडूंना दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

…आणि त्या दिवशी १०० शतकांचा पाया रचला गेला

भारताच्या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत चुकवलेत ७ डीआरएस; नेटकरी म्हणाले, ‘सिराज अन् रिव्ह्यू, नको रे बाबा’

डावखुऱ्या भारतीय खेळाडूंची ड्रीम ११; पाहा कोण आहे यष्टीरक्षक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---