संयुक्त अरब अमिराती येथे सातव्या टी२० विश्वचषकाला सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसातच चार सामने खेळले गेले असून, या सामन्यांचे निकाल काहीसे चकित करणारे लागले. या चार सामन्यांनंतर दोन्ही गटांतील गुणतालिका कशी आहे. याची आपण माहिती घेऊया.
गट अ-
पहिल्या दोन दिवसात अ गटातील तीन सामने खेळले गेले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सामन्याने स्पर्धेला सुरुवात झाली होती. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला ५ गडी राखून पराभूत केले. पहिल्या दिवशी दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने होते. इंग्लंडने आपल्या गोलंदाजांच्या धारदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडीजचा डाव अवघ्या ५५ धावांमध्ये गुंडाळला. हे आव्हान त्यांनी पाच गडी राखून पार करत मोठ्या विजयाची नोंद केली.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिला सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यादरम्यान झाला. या सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद झाली. बांगलादेशने दिलेले १७२ धावांचे आव्हान श्रीलंकेने केवळ ५ गडी गमावत पार केले.
या तीन सामन्यांसह अ गटातील सर्व संघांनी आपला प्रत्येकी एक सामना खेळला आहे. मोठ्या विजयामुळे इंग्लंड सरस धावगतीच्या जोरावर पहिल्या क्रमांकावर असून, श्रीलंका आणि स्ट्रेलिया अनुक्रमे दुसरा आणि तिसर्या क्रमांकावर आहेत. पराभूत संघांपैकी सर्वात खराब धावगती वेस्ट इंडीजची असल्याने ते अखेरच्या स्थानावर आहेत.
ब गट-
टी२० विश्वचषकाच्या ब गटातील एकमेव सामना भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने भारताला तब्बल १० गडी राखून हरवले. त्यामुळे पाकिस्तानच्या धावगती चांगलीच सुधारली असून, ते गुणतालिकेत पहिल्या व भारत अखेरच्या स्थानावर आहे. सोमवारी (२५ ऑक्टोबर) या गटातील दुसरा सामना अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड व यांच्या दरम्यान शारजा येथे होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
आफ्रिदीचा ओव्हरथ्रो आणि भारताला मिळाल्या जास्तीच्या ४ धावा; पाहून जय शहा, अक्षय कुमारही लागले नाचू
‘ही धोक्याची घंटा नव्हे, ही तर सुरुवात’, पाकिस्ताविरुद्धच्या पराभवानंतर कोहलीने वाढवले संघाचे मनोबल
टी२० विश्वचषक: दोन दिवसांत दोन संघांनी रचला इतिहास; केली नवी सुरुवात