लाखो चाहत्यांच्या हृदयात असलेला विराट आज 33 वर्षांचा झाला आहे. त्याने 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले. बऱ्याच दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये लग्न केले. पण अनुष्का पूर्वी कोहलीने आणखी एका अभिनेत्रीला डेट केले होते.
त्या अभिनेत्रीचे नाव आहे इजाबेल लिटे. ती ब्राझिलियन माॅडेल आहे. इजाबेलने अभिनय कारकिर्दीची सुरूवात 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘तलाश’ या सिनेमाने केली. यानंतर तिने 2013 मध्ये ‘सिक्सटीन’ सिनेमा केला.
जून 2012 मध्ये विराट एका ब्राझीलच्या अभिनेत्रीला डेट करत असल्याची बातमी आली होती. विराट सिंगापूरमध्ये इजाबेल सोबत खरेदी करतानाही दिसला होता. तेव्हा इजाबेलला कोणी ओळखत नव्हते. त्यानंतर तिचा पहला सिनेमा प्रदर्शित झाला होता.
2014 मध्ये एका मुलाखतीत इजाबेलने कबूल केले होते की ती आणि विराट कोहली 2 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांच्यातील संबध परस्पर संमतीने संपले. त्यानंतर ते चांगले मित्र झाले.
इजाबेलच्या मित्रांच्यानुसार ते दोघे एका जाहिरातीच्या शूटींग दरम्यान सिंगापुरमध्ये भेटले होते. तसेच इजाबेल विराटच्या प्रेमात होती. ती विराटला भेटायला दिल्लीलाही जात होती. पण ते दोघे फारसे सार्वजनिक ठिकाणी जात नसत.
महत्त्वाच्या बातम्या-
बड्डे बाॅय विराट महिन्याला पितो ३६ हजार रुपयांचं पाणी…
विराट कोहलीचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास…!!