भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून सोमवारी (14 नोव्हेंबर) सर्व क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. वरिष्ठ टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. तर, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उज्वल करणाऱ्या 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येतील. तसेच प्रशिक्षकांसाठीच्या द्रोणाचार्य पुरस्कारांची देखील घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांचे वितरण 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवन येथे होईल.
जागतिक पातळीवर टेबल टेनिसमध्ये भारताचे नाव मोठे करणाऱ्या कमलला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. तसेच, त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार असणारा अर्जुन पुरस्कार 25 खेळाडूंना देण्यात येईल. बॅडमिंटनमधील विश्वचषक मानला जाणाऱ्या थॉमस कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या एचएस प्रनॉय व युवा बॅडमिंटनपटू लक्ष सेन यांचा या यादीमध्ये समावेश आहे. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गाजवणारे बॉक्सर निखत झरीन व अमित पंघल, स्टीपलचेस धावक अविनाश साबळे, लांब उडीपटू एल्डोस पॉल व थाळीफेकपटू सीमा पुनिया यांना देखील अर्जुन पुरस्कार देण्यात येईल.
यासोबतच पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशी, पॅरा जलतरणपटू स्वप्निल पाटील यांच्यासह मूकबधिर बॅडमिंटनपटू जर्लिन अनिका यांचा देखील या पुरस्काराने सन्मान करण्यात येईल. विशेष म्हणजे यंदा एकाही क्रिकेटपटूला हा पुरस्कार देण्यात आला नाही.
अर्जुन पुरस्कार 2022 विजेत्या सर्व खेळाडूंची यादी-
सीमा पुनिया (थाळीफेक), एल्डोस पॉल (लांब उडी), अविनाश साबळे (स्टीपलचेस), लक्ष सेन व एचएस प्रनॉय (बॅडमिंटन), निखत झरीन व अमित पंघल (बॉक्सिंग), भक्ती कुलकर्णी व आर प्रग्यनंदन (बुद्धिबळ), दीप ग्रेस इक्का (हॉकी), सुशीला कुमारी (जुदो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन सायकीया (लॉन बॉल), सागर ओव्हाळकर (मल्लखांब), एलावेनिल वलारियन व ओमप्रकाश मिथरवळ (नेमबाजी), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकूर (वेटलिफ्टींग), अंशू व सरिता (कुस्ती), श्री परवीन (वूशू), मानसी जोशी व तरूण ढिल्लोन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्निल पाटील (पॅरा जलतरण) व जर्लिन अनिका (मुकबधीर बॅडमिंटन).
(2022 Arjun Awards Announced)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषक तर जिंकलाच, पण आता आयपीएलही जिंकायला निघाला इंग्लंडचा ‘हा’ पठ्ठ्या; म्हणाला, ‘मी आता…’
पाकिस्तानचे नागरिकत्व घेतलेल्या सॅमीने सांगितले टीम इंडियाच्या पराभवाचे कारण; म्हणाला…