भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांना 1983च्या विश्वचषक विजयासाठी संपूर्ण क्रिकेटविश्वात ओळखले जाते. यासोबतच कपिल यांनी क्रिकेट कारकिर्दीत अनेक महत्वाचे विक्रमदेखील आपल्या नावे केले आहेत. कपिल हे एक शानदार गोलंदाज होते व त्यांच्या गोलंदाजीने भारतीय संघाला अनेक महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवून दिले आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे 30 जानेवारी 1994 रोजी कपिल यांनी कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वाधिक बळी मिळवण्याच्या रिचर्ड हेडली यांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली होती.
न्यूझीलंडचे दिग्गज गोलंदाज रिचर्ड हेडली यांनी 19व्या शतकात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 431 बळी मिळवले होते. कपिल यांनी आजच्या दिवशी 1994 साली झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात डॉन अरुणाश्री या खेळाडूला बाद करत आपल्या कारकिर्दीतील 431 वा बळी घेतला. कपिल यांनी या सामन्यातील पहिल्या डावात 3 तर दुसर्या डावात 2 गडी बाद केले होते. त्यानंतर कपिल यांनी 134 कसोटी सामन्यात 434 बळी मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.
व्हिडिओ पाहा- काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
पुढे जागतिक कसोटी संघातील कित्येक गोलंदाजांनी 450 हून अधिक बळी टिपत कपिल यांना मागे टाकले. सध्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये श्रीलंकाचा मुथेय्या मुरलीधरन अव्वलस्थानी आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 गडी बाद केले आहेत. तर ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न (708 विकेट्स) दुसऱ्या आणि भारतीय दिग्गज अनिल कुंबळे (619 विकेट्स) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारताने एकहाती जिंकला होता सामना
भारताने हा सामना एकतर्फा जिंकला होता. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या 108 व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 96 धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 541 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव 231 धावांवर आटोपला. फॉलोऑन मिळाल्यानंतर श्रीलंकेला दुसरा डावही केवळ 211 धावांवर संपुष्टात आला व भारतीय संघाने एक डाव 95 धावांनी मोठा विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना नियमांचे पालन करून टेनिस स्पर्धेचे आयोजन- अजितदादा पवार
‘आठव्या क्रमांकावर फलंदाजी थोडी लवकर होईल, मला ११ नंबरला ठेवा’; जडेजाचे ट्वीट का आहे चर्चेत?
वर्ल्ड जायंट्स ठरले लिजेंड्स लीग क्रिकेटचे ‘दिग्गज’, आशिया लायन्सला २५ धावांनी नमवत मिळवले जेतेपद
हेही पाहा-