वनडे विश्वचषक 2023 मध्ये अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. भारताच्या मजबूत फलंदाजी विरुद्ध त्यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत भारताचा डाव 240 पर्यंत मर्यादित ठेवला. भारतासाठी विराट कोहली व केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली.
INDIA NEED TO DEFEND 241 TO WIN THE WORLD CUP….!!!! 🇮🇳 pic.twitter.com/SmvrtKNlBZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 19, 2023
या अंतिम सामन्यात भारतीय संघाला नाणेफेक जिंकल्यात अपयश आले. मात्र, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताला पहिला धक्का लवकर बसला व गिल केवळ चार धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली व रोहित शर्मा यांनी भारताचा डाव सावरला. रोहितने केवळ 31 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या. त्या पाठोपाठ श्रेयस अय्यर केवळ चार धावा करून बाद झाला.
फलंदाजी दबावात आल्यानंतर विराट व राहुल यांनी संयमाने खेळ दाखवला. विराटने अप्रतिम फलंदाजी करताना अर्धशतक साजरे केले. तो दुर्दैवीरीत्या बाद झाला. त्यानंतर राहुलने जबाबदारी घेत 66 धावांची खेळी केली. खालच्या फळीत सूर्यकुमार यादव व रवींद्र जडेजा हे फारसे योगदान देऊ न शकल्याने भारताचा डाव 240 पर्यंत मर्यादित राहिला.
ऑस्ट्रेलिया संघासाठी मिचेल स्टार्कने 3 तर कमिन्स व हेजलवूड यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघाचे हे तिसरे विश्वविजेतेपद असेल.
(2023 Odi World Cup Final India Post 240 Against Australia Virat Kohli And Rahul Fifty)