वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (14 ऑक्टोबर) पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. रोमांचक सामन्याची अपेक्षा असताना यजमान भारतीय संघाने पाकिस्तानला या सामन्यात डोके वर काढू दिले नाही. गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी तुफानी फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने सलग तीन विजय पूर्ण केले. तसेच पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील आपली विजयाची परंपरा कायम राखली.
https://www.instagram.com/reel/CyYhXHGv1cC/?igshid=MzRlODBiNWFlZA==
पाकिस्तानला इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीक यांनी आठ षटकात 41 धावांची सलामी दिली. शफीकला सिराजने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. इमाम याने 36 धावांचे योगदान दिले. त्यानंतर कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिजवान यांनी 78 धावांची भागीदारी केली. बाबर अर्धशतक करून बाद झाला. बाबर बाद झाला तेव्हा पाकिस्तानची अवस्था तीन बाद 155 अशी होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपला फास आवळला आणि पाकिस्तानला 191 धावांवर सर्वबाद केले. भारतीय संघासाठी सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. बुमराह, सिराज, हार्दिक, कुलदीप व जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल व विराट कोहली प्रत्येकी 16 धावा करून बाद झाले. त्यानंतर रोहित शर्मा व श्रेयस अय्यर या दोघांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी 77 धावांची भागीदारी करत भारताचा विजय सोपा केला. रोहित ने 63 चेंडूंमध्ये प्रत्येकी सहा चौकार व सहा षटकार ठोकत 86 धावांची खेळी केली. श्रेयसने अखेरपर्यंत नाबाद राहत अर्धशतकी खेळी करून राहुलसह भारताला विजय मिळवून दिला.
(2023 ODI World Cup India Beat Pakistan By 7 Wickets Rohit Sharma Bumrah Kuldeep Shines)
महत्वाच्या बातम्या –
सिक्स हिटिंग मशिन शर्मा जी! तुफानी अर्धशतकासह वनडेत ठोकली षटकारांची ‘ट्रिपल सेंच्युरी’
इंग्लंड सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील, अफगाणिस्तानचे पहिल्या विजयावर लक्ष