सध्या झिम्बाब्वे येथे आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर सामने खेळले जात आहेत. क्वालिफायरमधील सुपर 6 फेरीतील सामना मंगळवारी ( 4 जुलै) पार पडला. या सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध स्कॉटलंड संघ समोरासमोर होते. हा सामना दोन्ही संघासाठी खूपच महत्त्वाचा होता. हा सामना स्कॉटलंड संघाने 31 धावांनी जिंकत झिम्बाब्वे संघाला पराभवाचा धक्का दिला. यासह यजमान संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले व त्यांची विश्वचषकासाठी पात्र होण्याची संधी हुकली. मात्र, दुसऱ्या बाजूला स्कॉटलंड संघाची विश्वचषकासाठी पात्र होण्याची सर्वाधिक संधी निर्माण झाली आहे.
https://www.instagram.com/reel/CuR01TytRE1/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
या सामन्यात पराभूत झाल्यानंतर झिम्बाब्वे संघाचे सलग दुसऱ्या विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न थोडक्यात भंग पावले. या विजयासह स्कॉटलंड संघाने या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारली. पहिल्या क्रमांकावरील श्रीलंका संघाने यापूर्वीच सर्वसामान्य जिंकत विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. तर, वेस्ट इंडिज व ओमान यापूर्वीच स्पर्धेतून बाद झाले आहेत.
सुपर सिक्स फिरतील अद्याप तीन सामने बाकी आहेत. यामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध ओमान व वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका हे फारसे महत्त्वपूर्ण नाहीत. मात्र, 6 जून रोजी होणाऱ्या स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स या सामन्यातून विश्वचषकातील दहावा संघ निश्चित होईल.
हा सामना स्कॉटलंड संघाने कोणत्याही फरकाने जिंकला तरी ते विश्वचषकासाठी पात्र ठरतील. दुसरीकडे नेदरलँड्स संघाला हा सामना 30 पेक्षा अधिक धावांनी जिंकणे अनिवार्य असेल. तसेच, धावांचा पाठलाग करताना या संघाला सहा षटके राखून विजय संपादन करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी स्कॉटलंड संघाचे पारडे जड दिसून येते.
(2023 ODI World Cup Qualifiers One Spot Remain Scotland And Netherlands Decider)
महत्वाच्या बातम्या-
उद्ध्वस्त होत असलेल्या विंडीजला वाचवण्यासाठी धावून आला ब्रायन लारा, भारताविरुद्धच्या मालिकेत मोठी जबाबदारी
ब्रेकिंग! पुरुषांच्या इमर्जिंग Asia Cup 2023साठी भारतीय संघाची निवड, नेतृत्वाची धुरा ‘या’ पठ्ठ्याकडे