---Advertisement---

होप-पूरनने दाखवली कॅरेबियन पॉवर! वर्ल्डकप क्वालिफायर्समध्ये नोंदवला सलग दुसरा विजय

On: गुरूवार, जून 22, 2023 10:23 PM
---Advertisement---

झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या वनडे विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेत गुरुवारी (22 जून) वेस्ट इंडीज विरुद्ध नेपाळ असा सामना खेळला गेला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात मजबूत वेस्ट इंडिज संघाने नेपाळवर तब्बल 101 धावांनी दणदणीत विजय मिळवला. कर्णधार शाई होप व निकोलस पूरन यांनी झळकावलेली शतके वेस्ट इंडिजच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या या सामन्यात नेपाळ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ब्रेंडन किंग व चार्ल्स यांना केवळ नऊ धावांवर बाद करत नेपाळने चांगली सुरुवात केली होती. सलामीवीर कायले मेयर्स 32 धावा करून तंबूत परतला. संघ अडचणीत आलेला असताना कर्णधार शाई होप व निकोलस पूरन यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी 216 धावांची मोठी भागीदारी रचत वेस्ट इंडीजला सामन्यात करून दिले. होपने 132 तर पूरनने 115 धावा केल्या. या दोघांच्या योगदानामुळे वेस्ट इंडीज संघ 339 पर्यंत पोहोचला.

या धावांचा पाठलाग करताना नेपाळचा संघ सुरुवातीपासूनच पिछाडलेला दिसला. यष्टीरक्षक आरिफ शेख वगळता इतर कोणालाही अर्धशतकी टप्पा पार करता आला नाही. जेसन होल्डर याने तीन तर जोसेफ, होसेन व किमो पॉल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत नेपाळचा डाव 238 धावांवर संपुष्टात आणला. वेस्ट इंडीजने आपल्या पहिल्या डावात अमेरिकेचा पराभव केला होता. या विजयासह वेस्ट इंडिज गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

(2023 ODI World Cup Qualifiers West Indies Beat Nepal By 101 Runs Shai Hope And Nicholas Pooran Hits Century)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---