---Advertisement---

मोठी अपडेट: वनडे विश्वचषकाचे तब्बल इतके सामने होणार पुण्यात, वाचा कोणते संघ भिडणार

On: मंगळवार, जून 27, 2023 12:51 PM
---Advertisement---

भारतात होणाऱ्या 2023 वनडे विश्वचषकाच्या वेळापत्रकाची मंगळवारी (27 जून) घोषणा झाली. तब्बल 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारतातील दहा शहरांमध्ये सामने खेळले जाणार आहेत. पुणे येथील एमसीए स्टेडियम येथे या विश्वचषकातील पाच सामने खेळले जातील. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यानचा साखळी फेरीतील सामना देखील याच मैदानावर रंगणार आहे.

भारतातील दहा शहरांमध्ये यावेळी विश्वचषकाचे सामने होतील. विशेष म्हणजे मोहालीला पछाडत पुणे स्पर्धेतील पाच सामन्यांचे यजमानपद घेण्यात यशस्वी ठरला. 1996 विश्वचषकानंतर प्रथमच पुण्यात विश्वचषकाचे सामने होणार आहेत. पुण्यापासून जवळच असलेल्या गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर हे सामने खेळले जातील.

या मैदानावरील पहिला सामना यजमान भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान खेळला जाईल. 19 ऑक्टोबर रोजी हा सामना पार पडेल. त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तान आणि पात्रता फेरीतून पुढे आलेला दुसरा संघ भिडतील. त्यानंतर न्युझीलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा मोठा सामना 1 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. तर इंग्लंड विरुद्ध पात्रता फेरीतून पुढे आलेला पहिला संघ 8 नोव्हेंबर रोजी आमने-सामने येथील. ऑस्ट्रेलिया व बांगलादेश यांच्यातील अखेरच्या सामन्याने 12 नोव्हेंबर रोजी साखळी फेरीची याच मैदानावर सांगता होणार आहे.

वनडे विश्वचषकाचे पुण्यात होणारे सामने:
भारत विरुद्ध बांगलादेश,19 ऑक्टोबर
अफगाणिस्तान विरुद्ध क्वलिफायर 2, 30 ऑक्टोबर
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 1 नोव्हेंबर
इंग्लंड विरुद्ध क्वलिफायर 1, 8 नोव्हेंबर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, 12 नोव्हेंबर

(2023 ODI World Cup Schedule Pune MCA Stadium Host Five Matches Including India V Bangaladesh)

महत्वाच्या बातम्या-
कोल्हापूरला पछाडत रत्नागिरी जेट्सची MPL फायनलमध्ये एन्ट्री! विजय पावले ठरला विजयाचा शिल्पकार 
BREAKING: वर्ल्डकपचे काउंटडाऊन सुरू! वेळापत्रक झाले जाहीर, अहमदाबादमध्ये होणार उद्घाटनाचा सामना 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---