जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ असलेल्या फुटबॉलच्या महिला विश्वचषकाचे आयोजन गुरुवारपासून (20 जुलै) ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे होणार आहे. पुढील महिनाभर सुरू राहणाऱ्या या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला असून, स्पर्धेत एकूण 900 कोटींच्या बक्षिसांची खैरात होईल.
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड आयोजित करत असलेल्या या स्पर्धेत 32 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एक पेक्षा जास्त संघ स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहेत. विश्वचषकातील उद्घाटनाचा सामना न्यूझीलंड विरुद्ध नॉर्वे असा ऑकलँड येथे होईल. तर, अंतिम सामना सिडनी येथे 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. सहभागी संघांना आठ गटांमध्ये विभागले असून, यातून 16 संघ उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.
या स्पर्धेत एकूण 64 सामने खेळवले जाणार आहेत. संपूर्ण स्पर्धा दोन्ही देशांतील 10 स्टेडियममध्ये पार पडेल. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी, मेलबर्न, पर्थ, ब्रिस्बेन आणि ऍडलेड या 6 स्टेडियममध्ये हा विश्वचषक खेळला जाईल. तर, न्यूझीलंडच्या ऑकलंड, वेलिंग्टन, ड्युनेडिन, हॅमिल्टन या 4 शहरांमध्ये सामने होणार आहेत.
Match Schedule for the 2023 FIFA Women's World Cup pic.twitter.com/5zHr4DIu2K
— Neal Symons (@neal_symons) December 2, 2021
स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना यावेळी मोठी बक्षिसांची रक्कम मिळणार आहे. भारतीय रुपयात ही रक्कम तब्बल 900 कोटी इतकी असेल. विजेत्या संघाला 86 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अमेरिकेचा संघ या स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्रिक करण्यासाठी उतरेल. 2015 व 2019 या सलग दोन स्पर्धांमध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले होते. अमेरिकेने आत्तापर्यंत एकूण चार वेळा हा विश्वचषक जिंकला आहे. याव्यतिरिक्त जर्मनीने दोनदा विश्वचषक उंचावलेला. तसेच जपान व नॉर्वे हे देखील प्रत्येकी एकदा विजेते ठरले आहेत.
(2023 Womens FIFA World Cup Kick Starts In Newzealand And Australia)
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेत जाऊन पाकिस्तानने जिंकली पहिली कसोटी, भारत-इंग्लंडच्या विक्रमाला तडा
शाहरुख बनला विश्वचषकाचा ब्रँड एंबॅसेडर! व्हायरल फोटोनंतर आयसीसीने शेअर केला खास व्हिडिओ