पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना पाहुण्या पाकिस्तान संघाने 4 विकेट्सने जिंकला. रविवारी (16 जुलै) सुरू झालेला हा सामना पाचव्या दिसी म्हणजेच गुरुवारी (20 जुलै) संपला. उभय संघांतील ही लढत चांगलीच रोमांचक झाली. सौद शकिल सामनावीर ठरला, ज्याने पहिल्या डावात द्विशतक केले होते.
श्रीलंकन संघाला मायदेसातील कसोटी सामन्यात पराभूत करणे कधीच सोपे राहिले नाहीये. पण पाकिस्तान संघाने श्रीलंकेत आतापर्यंत सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याची कामगिरी गुरुवारी (20 जुलै) नावावर केली. पाकिस्तानने श्रीलंकेमध्ये आतापर्यंत 26 कसोटी सामने खेळले असून यापैकी 10 सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेत 24 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी 9 सामन्यात विजय मिळवला आहे. इंग्लंडने याठिकाणी 18 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 9 सामन्यात विजय मिळवला आहे. आकडेवारी पाहता पाकिस्तान संघ भारत आणि इंग्लंडवर भारी पडल्याचे दिसते.
What a victory for Pakistan to start their #WTC25 campaign 👏https://t.co/YEiRaZbbwf
— ICC (@ICC) July 20, 2023
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला तर, पहिल्या डावात श्रीलंकेने 312 आणि पाकिस्तानने 461 धावा केल्या. पहिल्या डावात आघाडी मिळाल्यानंतर पाकिस्तानने श्रीलंकेचा दुसरा डाव 279 धावांवर गुडाळळा आणि विजयासाठी त्यांना 131 धावांचे लक्ष्य मिळाले. पाकिस्तानने अखेरच्या डावात हे लक्ष्य 32.5 षटकांमध्ये आणि 6 विकेट्स गमावून गाठले. श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
पहिल्या डावात पाकिस्तासाठी मध्यक्रमातील सौद शकिल (Saud Shakeel) याने 361 चेंडूत 208 धावांची नाबाद खेळी केली. परिणामी पाकिस्तानने या डावात 149 धावांची आघाडी घेतली आणि नंतर हीच आघाडी पाकिस्तानच्या विजयात महत्वाची ठरली. त्याआधी श्रीलंकेचा धनंजया डी सिल्बा याने आपल्या संघासाठी 122 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. पहिल्या डावात पाकिस्तानच्या गोलंदाजांचे प्रदर्शनही जबरदस्त राहिले.
शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि अबरार अहमद यांनी प्रत्येकी तीन-तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळवून दिला. दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या अबरार अहमद आणि नोमान अली यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. श्रीलंकेसाठी गोलंदाजी विभागात पहिल्या डावात रमेश मेंडिस याने पाच, तर प्रभत जयसूर्या याने 3 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या डावात श्रीलंकेसाठी प्रभत जयसूर्याने पुन्हा चमकदार कामगिरी करत 4 विकेट्स घेतल्या. पण संघाला एकट्याच्या जोरावर विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही.(Pakistan won the first Test in Sri Lanka, breaking the India-England record)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
मायदेशात पाकिस्तानने पराभूत केल्यामुळे खचून गेला श्रीलंकन कर्णधार, ‘या’ खेळाडूंवर काढला सगळा राग
‘…500 कारणं’, विराटच्या पाचशेव्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी BCCIची खास पोस्ट, तुम्हीही कराल कौतुक