गुरुवारपासून (दि. 20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्यासाठी खूपच खास आणि महत्त्वाचा आहे. कारण, भारताकडून विराट कोहली 500वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा क्रिकेटपटू बनेल. तो सचिन तेंडुलकर याच्यासोबत इतर खेळाडूंच्या यादीत विराजमान होणार आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयनेही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.
बीसीसीआयचे ट्वीट
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विराट कोहली याचे अभिनंदन केले आहे. बीसीसीआयने खास ट्वीट करत लिहिले आहे की, “प्रवासाचे कौतुक करण्यासाठी 500 कारणं. विराट कोहलीला भारतासाठी त्याच्या 500व्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी अभिनंदन.”
बीसीसीआयच्या या ट्वीटवर आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लाईक्स, 2 हजारांहून अधिक रिट्विट्स आणि 200हून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “चांगली कामगिरी कर विराट. खूप प्रेम आणि तुझा अभिमान वाटतो.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “संघाची धडकन शुभेच्छा.” आणखी एकाने कमेंट केली की, “कोहली जीव आहे आपला.”
500 reasons to admire the journey!
Congratulations to Virat Kohli on his 5️⃣0️⃣0️⃣th international match for #TeamIndia 🇮🇳🫡#WIvIND | @imVkohli pic.twitter.com/Y9lez80Q97
— BCCI (@BCCI) July 20, 2023
याव्यतिरिक्त बीसीसीआयने विराटचा व्हिडिओही शेअर केला आहे.
500 & Counting 😃
Hear from #TeamIndia Head Coach Rahul Dravid and milestone man Virat Kohli ahead of a special occasion 👌🏻👌🏻#WIvIND | @imVkohli pic.twitter.com/cJBA7CVcOj
— BCCI (@BCCI) July 20, 2023
विराट चौथा भारतीय
भारताकडून 500 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट चौथ्या स्थानी विराजमान होणार आहे. भारताकडून आणि जगभरात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने कारकीर्दीत एकूण 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचा समावेश आहे. धोनीने त्याच्या कारकीर्दीत भारताकडून 538 सामने खेळले आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी भारताचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड असून त्याने कारकीर्दीत एकूण 509 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. (bcci congratulates cricketer virat kohli for his 500th international match see tweet here)
भारतासाठी 500 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे क्रिकेटपटू
664- सचिन तेंडुलकर
538- एमएस धोनी
509- राहुल द्रविड
500- विराट कोहली*
महत्त्वाच्या बातम्या-
हर्षित राणाचा अविश्वसनीय कॅच पाहून 140 कोटी भारतीयांना वाटेल अभिमान! पाकिस्तानी फलंदाज अर्धशतकाविना तंबूत
Asia Cup 2023 : कोच द्रविडचा Team Indiaला गुरुमंत्र; म्हणाला, ‘पाकिस्तानशी 3 वेळा भिडण्यासाठी…’