गुरुवारपासून (दि. 20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात यजमानांना 3 दिवसातच पराभवाच्या खाईत ढकलले होते. अशात त्रिनिदाद येथे पार पडणारा दुसरा सामना दोन्ही संघांसाठी ऐतिहासिक असणार आहे. कारण, हा भारत आणि वेस्ट इंडिज संघातील 100वा कसोटी सामना असेल. भारतीय कर्णधार रोहित शर्मा या कसोटी सामन्यासाठी खूपच उत्साही आहे. त्याच्यासाठीही हा खास सामना आहे. कारण, तो या 100व्या कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करणार आहे.
काय म्हणाला रोहित?
सामन्याच्या एक दिवस आधी रोहित शर्मा याने 100व्या ऐतिहासिक कसोटी सामन्याविषयी भाष्य केले. यावेळी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे रोहितने रंजक उत्तर दिले. तो म्हणाला की, “मोठा क्षण आहे. दोन्ही देशांमध्ये 100वा कसोटी सामना खेळला जाणार आहे. दोन्ही देशांचा दीर्घ क्रिकेट इतिहास राहिला आहे. माझा त्यावेळी जन्मही झाला नव्हता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये कसोटी क्रिकेट खेळले जात आहे. दोन्ही संघांनी चांगले क्रिकेट खेळले आहे. आशा करतो की, 100वा कसोटी सामनाही असाच राहील.”
A special century 💯
Hear what #TeamIndia Captain @ImRo45 had to say on the occasion of 1️⃣0️⃣0️⃣th Test between India & @windiescricket 👌🏻👌🏻
Watch the Full Press Conference Here 🔽 #WIvIND https://t.co/zl5hIBNczw pic.twitter.com/3k5lgR84PL
— BCCI (@BCCI) July 19, 2023
यावेळी रोहितला एक भीतीही सतावत आहे. ही भीती त्याने माध्यमांसमोर सांगितली. खरं तर, पोर्ट ऑफ स्पेन येथे सातत्याने पाऊस पडत आहे. अशात वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील 100व्या कसोटी सामन्यात (West Indies vs India 100th Test Match) पाऊस व्यत्यय आणू शकतो. अशात कसोटी सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. आता या सामन्यावर पावसाचा किती परिणाम होतो, याची कल्पना नाही. मात्र, 100व्या कसोटी सामन्यामुळे जो माहोल तयार झाला आहे, त्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो. कारण, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने हा सामना यादगार करण्यासाठी खूप तयारी केली आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला कसोटी सामना
विशेष म्हणजे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 75 वर्षांपूर्वी पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. हा कसोटी सामना भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या एक वर्षानंतर म्हणजेच 1948 साली खेळला गेला होता. हा सामना दिल्ली येथे खेळला गेला होता. मात्र, या सामन्याचा निकाल लागला नव्हता. हा सामना अनिर्णित राहिला होता. (skipper rohit sharma on india vs west indies historical 100th test port of spain its an honour to lead team india see video)
महत्त्वाच्या बातम्या-
मँनचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी ब्रॉडने रचला इतिहास, दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या 8 विकेट्स
युवा भारतीय संघाकडून पाकिस्तान चारी मुंड्या चीत! हंगरगेकर-साई सुदर्शन ठरले हिरो