एसीसी इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील 12वा सामना बुधवारी (दि. 19 जुलै) भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ संघात पार पडला. हा सामना भारतीय संघाने 8 विकेट्सने आपल्या खिशात घातला. असे असले, तरीही पाकिस्तानचा डाव सुरू असताना भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हर्षित राणा याने एक अविश्वसनीय झेल पकडला. हा झेल आता सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनला आहे. हर्षितच्या झेलाचा व्हिडिओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.
हर्षित राणा झेल
भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ (India A vs Pakistan A) संघात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअमवर हा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानच्या डावात 46वे षटक भारत अ संघाकडून राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) टाकत होता. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर पाकिस्तानी फलंदाज कासिम अक्रम स्ट्राईकवर होता. यावेळी कासिमने राजवर्धनच्या चेंडूवर जोरात फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो चेंडू योग्य वेळी बॅटवर आला नाही आणि चेंडू बॅटची बाहेरील कड घेऊन शॉर्ट थर्डच्या दिशेने जाऊ लागला.
यावेळी हर्षित राणा (Harshit Rana) तिथे क्षेत्ररक्षण करत होता. हर्षितने स्वत:च्या वरून जाणारा चेंडू पाहून उंच उडी मारली आणि झेल पकडला. हर्षितचा हा झेल पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. हर्षितच्या झेलाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.
भारताचा विजय
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 48 षटकातच सर्व विकेट्स गमावत 205 धावा केल्या होत्या. यामध्ये कासिम याने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने 63 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 48 धावांची खेळी साकारली होती. तसेच, या यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना अष्टपैलू हंगरगेकर याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर साई सुदर्शन याने शतक झळकावले. त्याने 110 चेंडूत नाबाद 104 धावा चोपल्या. त्यात 3 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त निकिन जोस यानेही 53 धावांचे मौल्यवान योगदान दिले. तसेच, कर्णधार यश धुल (नाबाद 21) आणि अभिषेक शर्मा (20) यांनीही खारीचा वाटा उचलला. (ind vs pak cricketer harshit rana take marvelous catch against pakistan see video)
महत्त्वाच्या बातम्या-
Asia Cup 2023 : कोच द्रविडचा Team Indiaला गुरुमंत्र; म्हणाला, ‘पाकिस्तानशी 3 वेळा भिडण्यासाठी…’
WI vs IND : 100व्या ऐतिहासिक कसोटीसाठी संघ तयार, विराटही खेळणार 500वा सामना; वाचा सविस्तर