---Advertisement---

KCL 2026: विजेतेपद पटकावल्यानंतर संपूर्ण टीम पोहोचली थेट हॉस्पिटलमध्ये, हृद्यस्पर्शी सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

On: सोमवार, सप्टेंबर 7, 2026 12:29 PM
---Advertisement---

केरळ क्रिकेट लीग 2026 चा विजेता ठरला थ्रिसूर टायटन्स. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टायटन्सने कालिकत ग्लोबस्टर्सला 3 विकेट्सने पराभूत केले. त्यांचे हे ऐतिहासिक पहिले विजेतेपद ठरले. या सामन्यातील विजयानंतर टायटन्सने ज्याप्रकारे सेलिब्रेशन केले त्यामुळे त्यांनी सर्व चाहत्यांचे मन जिंकले आहे. त्यांचा या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

टायटन्सचा संपूर्ण संघ विजयानंतर थेट तिरुवनंतपुरमच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तेथे त्यांनी आपला दुखापतग्रस्त खेळाडू शॉन रॉजर याच्या जवळ ट्रॉफी ठेवून विजयाचा जल्लोष केला.

रॉजरला नेमके झाले काय?
अंतिम सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना झेल घेण्याच्या नादात रॉजरची त्याच्याच संघातील खेळाडूसोबत मोहम्मद इनानशी टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की इनानचा गुडघा थेट रॉजरच्या छातीवर आदळला. त्यानंतर रॉजर बेशुद्ध पडला. त्याच्यावर तात्काळ उपचार करून हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.

रॉजरच्या संघाने चषक जिंकल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ते ट्रॉफी घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तेव्हा डाव्या हाताला स्लिंग लावलेल्या अवस्थेत रॉजर होता. एका संघसहकाऱ्याने भावूक होत त्याच्यापाशी ट्रॉफी ठेवली. त्याला विजयाचे मेडलही घातले. या क्षणाचा व्हिडिओ रॉजरने शेअर केला आहे.

रॉजरचे योगदान
या स्पर्धेत टायटन्सच्या विजयाचा रॉजर महत्त्वाचा पैलू राहिला. त्याने 12 सामन्यांमध्ये 26.90 च्या सरासरीने आणि 120.63 च्या स्ट्राईक रेटने एका अर्धशतकाच्या सहाय्याने 269 धावा केल्या.

टायटन्सने या स्पर्धेच्या साखळी फेरीतील 10 पैकी 5 सामने जिंकत 11 गुणांसह तिसरे स्थान काबीज केले होते. त्यांनी उपांत्य फेरीत त्रिवेंद्रम रॉयल्सचा एक विकेटने पराभव करत अंतिम फेरी गाठली.

मागील हंगामाच्या उपांत्य फेरीत 10 विकेट्सने पराभूत झालेल्या टायटन्सने यंदा विजेतेपद जिंकले. त्याचबरोबर त्यांनी सांघिक भावना दाखवत एक उत्तम आदर्शही निर्माण केला. (Thrissur Titans won maiden Kerala Cricket League Title and celebrates with hospitalised Shoun Roger)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---