मागील काही काळापासून क्रिकेटप्रेमी आशिया चषक 2023 स्पर्धेच्या वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहत होते. आता बुधवारी (दि. 19 जुलै) ही प्रतीक्षा संपली. 30 ऑगस्ट रोजी स्पर्धेचा पहिला सामना खेळला जाईल. तसेच, बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना 2 सप्टेंबर रोजी कँडी येथे खेळला जाईल. यानंतर दोन्ही संघ सुपर 4मध्येही आमने-सामने येऊ शकतात. समीकरणानुसार घडलं, तर अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान एकमेकांना भिडतील. म्हणजेच, या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघ तीन वेळा भिडू शकतात. स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
‘एकावेळी एका सामन्यावर लक्ष’
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचा रोमांच काय असतो, हे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याला चांगलेच माहिती आहे. मात्र, त्याने असे म्हटले आहे की, ते एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष देतात. द्रविडचा विश्वास आहे की, भारत-पाकिस्तान (India-Pakistan) संघात एक मोठा सामना होईल, पण त्याने असेही म्हटले की, भारताला एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष द्यावे लागेल.
तो म्हणाला की, “आम्हाला माहितीये की, पहिल्या दोन सामन्यात आम्हाला पाकिस्तान आणि नेपाळविरुद्ध खेळायचे आहेत. आम्ही त्यावरच लक्ष दिले पाहिजे.”
‘जास्त विचार करत नाही’
त्रिनिदाद येथे वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी राहुल द्रविड म्हणाला की, “वेळापत्रक आले आहे आणि तुम्हाला पाकिस्तानविरुद्ध तीन वेळा खेळण्यासाठी आधी सुपर 4साठी क्वालिफाय करावे लागेल. त्यामुळे एकावेळा एकच पाऊल. मी भविष्यातील खूप जास्त योजना बनवत नाही.”
🎥 With the #AsiaCup2023 fixtures announced, here's what #TeamIndia Head Coach Rahul Dravid said 🔽 pic.twitter.com/ycEWukD5zW
— BCCI (@BCCI) July 19, 2023
‘सुरुवातीला चांगले खेळावे लागेल’
पुढे बोलताना द्रविड म्हणाला की, “आम्हाला माहितीये की, पहिल्या दोन सामन्यात आम्हाला पाकिस्तान आणि नेपाळविरुद्ध खेळायचे आहे. आम्हाला त्यावरच लक्ष दिले पाहिजे. आम्हाला त्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी चांगले क्रिकेट खेळावे लागेल. यानंतर आम्ही पाहू की, स्पर्धा कुठल्या दिशेला जाते. जर आम्हाला त्यांच्याविरुद्ध तीन वेळा खेळण्याची संधी मिळाली, तर हे शानदार ठरेल. म्हणजेच आम्ही स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचू. तसेच, दुसरीकडे पाकिस्तानही पोहोचेल. हा एक मोठा सामना असेल. हे आमच्यासाठीही चांगले असेल आणि नक्कीच आम्ही अंतिम सामन्यात पोहोचून तो जिंकू. मात्र, त्यापूर्वी आम्हाला दोन पावले टाकावी लागतील.”
The fixtures for #AsiaCup2023 are out! 🙌
A look at #TeamIndia's group stage matches 🔽 pic.twitter.com/W0RORs9qfa
— BCCI (@BCCI) July 19, 2023
भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघ ‘अ’ गटात
आशिया चषकाच्या ‘अ’ गटात भारत आणि पाकिस्तानसह नेपाळ संघही आहे. या गटातील अव्वल दोन संघ सुपर 4मध्ये प्रवेश करतील. सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघातील सामना 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघामध्ये अंतिम सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघांचा समावेश आहे.
आशिया चषकात एकूण 13 सामने खेळले जातील. यातील चार सामने पाकिस्तानमध्ये होतील. कारण, स्पर्धेचे यजमानपद त्यांच्याकडे आहे. त्यानंतर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळले जातील. पाकिस्तानच्या मुल्तान आणि लाहोर येथे हे सामने खेळले जातील. तसेच, श्रीलंकेच्या कोलंबो आणि कँडी येथे 9 सामन्यांचे आयोजन होईल. (indian coach rahul dravid on asia cup india pakistan match)
महत्त्वाच्या बातम्या-
WI vs IND : 100व्या ऐतिहासिक कसोटीसाठी संघ तयार, विराटही खेळणार 500वा सामना; वाचा सविस्तर
‘काका-पुतण्याची मस्त मज्जा’, इरफानच्या पुतण्यासोबतच्या डान्स व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट