बीसीसीआयने अजित आगरकर यांना काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली. अशात आगामी वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडण्याची जबाबदारी आगरकरांच्या खांद्यावर असणार आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्म यांच्याशी चर्चा करण्याच्या हेतूने आगरकर वेस्ट इंडीजला जाण्याच्या तयारीत आहेत.
यावर्षीची वनडे विश्वचषक (ICC ODI WC 2023) भारतात खेलला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ (BCCI) या विश्वचषकाला विलक्षण बनवण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. मात्र, भारतीय खेळाडू आणि एकंदरीत संघाचे प्रदर्शन महत्वाचे राहणार आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून हा वनडे विश्वचषक सुरू होणार असून भारताला विश्वचषकातील आपला पाहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. तसेच 15 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्वाचा सामना अहमदाबादमध्ये पार पडेल.
बीसीसीआयच्या एका विश्वसनीय सूत्राकडून अशी माहिती मिळाली की, कसोटी मालिका संपल्यानंतर अजित आगरकर (Ajit Agarkar) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची भेट घेतील. अजित आगरकर निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांनी संघ व्यवस्थापनाची वैयक्तिक एकही भेट घेतली नाहीये. अशात ही भेट महत्वाची ठरू शकते. वनडे विश्वचषकात भारतीय संघाची रणनीती काय असेल, याविषयी बैठकीत महत्वाच्या चर्चा होऊ शकतात. खेळाडूंची फिटनेस, सतत क्रिकेट खेळल्यामुळे खेळाडूंना येणाऱ्या अडचणी यावरही चर्चा होऊ शकते. सोबत विश्वचषकाच्या दृष्टीने ज्या 20 खेळाडूंचा विचार संघ व्यवस्थापन करत आहे, त्यावरही काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात. जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर या महत्वाच्या खेळाडूंचे पुनरागमन हादेखील चर्चेचा विषय असेल.
जसप्रीत बुमराह आगामी आयर्लंड दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असात द्रविड, राहुल आणि आगरकर यांच्यातील चर्चेनंतर हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याव्यतिरिक्त आयर्लंड दौऱ्यावर राहुल द्रविड ऐवजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख वीवीएस लक्ष्मण यांना मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली जाणार, असेही बोलले जात आहे. येत्या काळात याविषयी अधिकृत माहिती समोर येऊ शकते. दरम्यान, वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 20 जुलै रोजी त्रिनिदादमध्ये सुरू होईल. हा सामना जिंकला किंवा अनिर्णीत झाला, तर कसोटी मालिका भारताच्या नावावर होईल. कसोटी मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेलली जाणार आहे. (Ajit Agarkar will meet Rahul Dravid and Rohit Sharma in West Indies! Roadmap of World Cup to be prepared)
महत्वाच्या बातम्या –
धोनीच्या गॅरेजमध्ये आहेत एखाद्या शोरूमपेक्षा जास्त बाईक्स! समोर आला खास व्हिडिओ
पुणेरी पटलण टेबल टेनिस संघाची UTT सीझन 4 मध्ये पहिल्या विजयाची नोंद