---Advertisement---

BREAKING! 16व्या आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला भारत-पाकिस्तान भिडणार

On: बुधवार, जुलै 19, 2023 7:53 PM
virat kohli shaheen afridi
---Advertisement---

आशिया चषक 2023 चे वेळापत्रक अखेर समोर आले आहे. 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका देशात खेळवली जाणारी ही स्पर्धा सुरू होत आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे सहा संघ आशिया चषक 2023मध्ये खेळताना दिसणार आहे. पाकिस्तान आणि नेपाल संघ पहिल्या सामन्यात आमने सामने असतील.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यात आशिया चषक 2023च्या जयमानपदावर मोठा वाद पेटला होता. हायब्रिड मॉडेलच्या माध्यमातून आशिया चषकाच्या जयमानपदाचा तोडला कसाबसा निघाला. या मॉडेनुसार भारतीय संघाचे सर्व सामने पाकिस्तानबाहेर आयोजित केले जाणार आहेत. 2 सप्टेंबर रोजी भारतीय संघ आशिया चषकातील आपला पहिला सामना यजमान पाकिस्तानसोबत खेळणेल. हा सामना श्रीलंकेतील कँडीमध्ये आयोजित केला गेला आहे. पाकिस्तान, नेपाळ आणि भारत हे ग्रुप ए मध्ये आहेत. तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघ आहेत. दोन्ही ग्रुपमधील प्रत्येकी दोन-दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील आणि त्यातून पुठे अंतिम सामन्यासाठीचे दोन संघ निश्चित होतील. बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष जय शहा (Jay Shah) यांच्या सोशल मीडिया खात्यावरून हे वेळापत्रक शेअर केले गेले आहे.

https://twitter.com/JayShah/status/1681658142633910279?s=20

आशिया चषक 2023 चे संपूर्ण वेळापत्रक,
ग्रुप स्टेज

30 ऑगस्ट – पाकिस्तान विरुद्ध नेपाळ (मुलतान, पाकिस्तान)
31 ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (कँडी, श्रीलंका)
2 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध भारत (कँडी, श्रीलंका)
3 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (लाहोर, पाकिस्तान)
4 सप्टेंबर – भारत विरुद्ध नेपाळ (कँडी, श्रीलंका)
5 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (लाहोर, पाकिस्तान)
सुपर फोर
(A1 – ग्रुप ए मधील पहिला संघ, A2 – ग्रुप ए मधील दुसरा संघ, B1 -ग्रुप बी मधील पहिला संघ, B2 – ग्रुप बी मधील दुसरा संघ)
6 सप्टेंबर – A1 विरुद्ध B2 (लाहोर, पाकिस्तान)
9 सप्टेंबर – B1 विरुद्ध A2 (कोलंबो, श्रीलंका)
10 सप्टेंबर – A1 विरुद्ध A2 (कोलंबो, श्रीलंका)
12 सप्टेंबर – A2 विरुद्ध B1 (कोलंबो, श्रीलंका)
14 सप्टेंबर – A1 विरुद्ध B1 (कोलंबो, श्रीलंका)
15 सप्टेंबर – A2 विरुद्ध B2 (कोलंबो, श्रीलंका)
अंतिम सामना
17 सप्टेंबर – सुपर फोरमधील पहिला विरुद्ध दुसरा संघ (कोलंबो, श्रीलंका)

(The 16th edition of the Asia Cup schedule is out now.)
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामना रोमांचक वळणावर! पाचच्या दिवशी दोन्ही संघ विजयासाठी भिडणार
आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये भारतीयांची हवा! कर्णधार रोहितला मिळाले मोठे यश, विराट ‘या’ स्थानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---