पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना चांगलाच रंगात आला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी फाकिस्तान संघ श्रीलंका दौऱ्यावर आला आहे. पहिला सामना गॉल स्टेडियमवर खेळला जात आहे. चौथ्या दिवसाखेर पाकिस्तान संघाने आपल्या दुसऱ्या डावात 3 बाद 48 धावा केल्या आहेत. अशात शेवटचा दिवशी सामना कोणाच्या बाजूला झुकतो हे पाहण्यासारखे असेल.
तिसऱ्या दिवसाखेर श्रीलंकन संघाने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली होती. संघाने 3.4 षटकात 14 धावा केल्या असताना दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. चौथ्या दिवशी विश्वा फर्नांडो आणि कर्णधार दिमुथ कुरुनारत्ने यांनी श्रीलंकेच्या डावाची सुरुवात केली. श्रीलंकन संघ सामन्याच्या दुसऱ्या डावात 83.1 षटके खेळला आणि 279 धावांवर सर्वबाद झाला. धनंजया डी सिल्वा याने 82 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पहिल्या डावात त्यानेच 122 धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. पहिल्या डावात पाकिस्तान संघ 149 धावांनी आघाडीवर असल्यामुळे अखेरच्या डावातही त्यांना लक्ष्य कमी मिळाले. विजयासाठी शेवटच्या डावात पाकिस्तानला 131 धावा हव्या आहेत.
चौथ्या दिवसाखेर त्यांना 3 बाद 48 धावा केल्या असून अजून 83 धावांची आवश्यकता पाकिस्तान संघाला आहे. दुसरीकडे श्रीलंकन संघाला मायदेशातील ही कसोटी मालिका जिंकण्यासाठी शेवटच्या दिवशी अजून 7 विकेट्स हव्या आहेत. अशात शेवटच्या दिवसाचा खेळ चांगलाच रंगतदार असणार आहे. पाकिस्तानसाठी सौद शकील पहिल्या सामन्यात 208 धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. अशात दुसऱ्या डावात देखील तो श्रीलंकन संघाच्या निशाण्यावर असणार आहे. सध्या इमाम उल हक आणि कर्णधार बाबर आझम खेळपट्टीवर आहेत. दोघांनी अनुक्रमे 25* आणि 6* धावा केल्या असून शेवटच्या दिवशी डावाची सुरुवात करतील.
प्रभत जयसूर्या याने श्रीलंकेसाठी सुरुवातीच्या दोन विकेट्स स्वस्तात घेतल्या आहेत. पण पाचव्या दिवशीही गोलंदाजी विभागाला चमकदार कामगिरी करावी लागणार आहे, जेणेकरून श्रीलंका मायदेशातील कसोटी मालिकेची सुरुवात विजयासह करू शकेल. (Sri Lanka vs Pakistan match at an exciting turn! On the fifth day, both the teams will clash for victory)
महत्वाच्या बातम्या –
आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये भारतीयांची हवा! कर्णधार रोहितला मिळाले मोठे यश, विराट ‘या’ स्थानी
BANvsIND । दुसऱ्या वनडेत आलं जेमिमा नावाचं वादळ! भारताचा मोठा विजय