IPL 2024 Auction: मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) दुबई येथे इंडियन प्रीमिअर लीग 2024चा लिलाव रंगतदारपणे पार पडत आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियाला नुकतेच विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब जिंकून देणारा कर्णधार पॅट कमिन्स याच्यावर पैशांचा पाऊस पडला. त्याच्यावर आयपीएल लिवावाच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाने ताफ्यात घेतले.
पॅट कमिन्स हैदराबादकर
आयपीएल 2024 (IPL 2024) लिलावात पॅट कमिन्स (Pat Cummins) याने आपली बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली होती. त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघात काट्याची टक्कर सुरू होती. मात्र, अखेरीस हैदराबादनेच त्याला 20 कोटी 50 लाख रुपये देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. (2023 World Cup winning captain Pat Cummins goes to Sunrisers Hyderabad for a whopping 20.5 Crore rupees in ipl 2024 auction)
कमिन्सला आयपीएलचा चांगला अनुभव
आयपीएल 2023 मागील हंगामात केकेआर (KKR) संघाचा भाग असणाऱ्या कमिन्सला आयपीएल खेळण्याचा मोठा अनुभव आहे. कमिन्सने आतापर्यंत आयपीएलचे 5 हंगाम खेळले आहेत. त्याने यादरम्यान 42 सामने खेळले आहेत. त्यात त्याने गोलंदाजी करताना 45 कोटी आणि 379 धावा केल्या होत्या.
हेही वाचा-
IPL 2024 Auction: वर्ल्डकप गाजवणारा पठ्ठ्या CSKच्या ताफ्यात, रचिन ‘एवढ्या’ कोटी रुपयात बनला चेन्नईकर
IPL 2024 Auction: भारतीय संघाला नडणाऱ्या ट्रेविस हेडला हैदराबादने ‘एवढे’ कोटी देत केले मालामाल, आकडा पाहाच