टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून या मेगा स्पर्धेसाठी सर्व संघ जोरात तयारी करत आहेत. यंदा ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तपणे आयोजित केली जात आहे.
हा टी20 विश्वचषक अनेक खेळाडूंसाठी शेवटचा असू शकतो. विश्वचषकानंतर अनेक खेळाडू स्वेच्छेनं निवृत्ती जाहीर करू शकतात तर अनेकांना त्यांच्या संघांकडून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा 5 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे या विश्वचषकानंतर निवृत्तीची घोषणा करू शकतात.
रोहित शर्मा – टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल बोललं जात आहे की, बीसीसीआय त्याला टी20 विश्वचषकानंतर पुन्हा टी20 संघात संधी देणार नाही. मात्र टी20 मधून बाहेर पडल्यानंतरही तो वनडे आणि कसोटीमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसेल. रोहित सध्या 37 वर्षांचा असून, आता छोट्या फॉरमटमध्ये खेळण्यासारखी त्याची फिटनेस राहिली नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरनं एकदिवसीय आणि कसोटीतून निवृत्ती जाहीर केली असून आता तो फक्त टी20 क्रिकेट खेळतोय. डेव्हिड वॉर्नरबद्दल बोललं जात आहे की, तो या टी20 वर्ल्ड कपनंतर या फॉरमॅटमधूनही निवृत्तीची घोषणा करू शकतो. डेव्हिड वॉर्नरनं आतापर्यंत खेळलेल्या 103 टी20 सामन्यांमध्ये 3099 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्यानं 1 शतक आणि 26 अर्धशतकं झळकावली आहेत.
आंद्रे रसेल – अनुभवी कॅरिबियन अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलसाठी यंदाचा विश्वचषक त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा ठरू शकते. रसेलनं आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत खेळलेल्या 76 सामन्यांमध्ये 970 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्यानं 51 विकेट्स घेतल्या आहेत.
मोईन अली – इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीबद्दलही बोललं जात आहे की, टी20 विश्वचषकानंतर त्याला इंग्लंड संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. मोईन अलीनं आतापर्यंत खेळलेल्या 84 सामन्यांमध्ये 1158 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्यानं 48 विकेट्स घेतल्या आहेत.
टिम साऊदी – न्यूझीलंडच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या टीम साऊदीबद्दल बोललं जात आहे की, तो टी20 विश्वचषकानंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो. तो गेल्या काही काळापासून दुखापतींनी त्रस्त असून त्यामुळे त्याच्या फॉर्मची समस्या कायम आहे. साऊदीनं आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत खेळलेल्या 123 सामन्यात 157 विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील असे 5 सामने ज्यात सर्वाधिक डॉट बॉल खेळले गेले
आयर्लंडला हलक्यात घेणं परवडणारं नाही, टीम इंडियासाठी ‘हे’ 5 खेळाडू ठरू शकतात धोकादायक
93 कोटींची एकूण बक्षीस रक्कम, विजेत्यावर होणार पैशांचा वर्षाव; टी20 विश्वचषकातून कोणताही संघ रिकाम्या हातानं परतणार नाही!