सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेआधी जो संघ निवडला गेला त्यामध्ये तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरला पहिल्या तीन सामन्यांसाठी संघात घेतले गेले. तिलक दुखापतीमुळे या मालिकेत खेळला नाही. आता तो पूर्णपणे तंदुरूस्त असून त्याने सरावही सुरू केला आहे. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (२६ जानेवारी) श्रेयसबाबत मोठी घोषणा केली आहे.
बीसीसीआयने तिलकच्या अजूनही पूर्णपणे तंदुरूस्त असल्याचा अहवाल आलेला नाही. तो बीसीसीआयच्या बेंगलोरच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपल्या पुनर्वसन प्रक्रियेत सातत्याने प्रगती करत आहे. त्याला सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार होण्यास वेळ लागेल. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या उर्वरित दोन टी२० सामन्यांसाठी संघाचा भाग नसणार, त्याच्या ऐवजी श्रेयस संघाचा भाग असणार आहे.
तिलक पूर्णपणे फिट झाला तर तो ३ फेब्रुवारीला मुंबईत भारताच्या संघासोबत टी२० विश्वचषक २०२६च्या सराव सामन्याआधी जोडला जाईल.
टी२० विश्वचषकाआधी भारतासाठी तिलक फिट असल्याचे चांगले संकेत आहेत. त्याने भारतासाठी २०२५च्या आशिया कप अंतिम सामन्यात महत्वाची खेळी केली होती. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात नाबाद ६९ धावा केल्या होत्या. तो भारताच्या टी२० संघात सध्या नसल्याने श्रेयसची संघात निवड झाली.
श्रेयसला अजूनही न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. या मालिकेतील तीन सामने झाले असून तिन्हीमध्ये इशान किशनला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले. हे तिन्ही सामने भारताने जिंकले असून मालिकाही खिशात टाकली आहे. यातील दुसऱ्या सामन्यात त्याने ३२ चेंडूत ७६ धावा केल्या होत्या. यामध्ये तो सामनावीरही ठरला होता.
न्यूझीलंड विरुद्धच्या उर्वरित दोन टी२० सामन्यांसाठी भारताचा संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (अक्षर पटेल), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन (विकेटकीपर), रवि बिश्नोई.






