---Advertisement---

टी20 वर्ल्ड कपसाठी 20व्या देशाने संघ केला जाहीर; भारतीय वंशाच्या खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद!

On: शुक्रवार, जानेवारी 30, 2026 9:14 PM
---Advertisement---

​टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आतापर्यंत 19 देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. (30 जानेवारी) रोजी, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अमेरिकेनेही (USA) आपल्या संघाची घोषणा केली. अशाप्रकारे, मेगा इव्हेंटसाठी संघ जाहीर करणारा अमेरिका हा 20 वा देश ठरला आहे. यापूर्वी उर्वरित 19 देशांनी आपापले संघ जाहीर केले होते.

​अमेरिकेच्या संघाचे नेतृत्व मोनांक पटेल करणार आहेत. मोनांक यांनी भारतात घरगुती क्रिकेटही खेळले आहे, मात्र भारतातील तीव्र स्पर्धेमुळे त्यांनी अमेरिकेकडे जाण्याचा निर्णय घेतला. मोनांक पटेल यांच्या नेतृत्वाखालील या संघात 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या 10 खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. अमेरिका दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होत आहे.

​यापूर्वी अमेरिकेने 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला होता, ज्याचे यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिजने संयुक्तपणे भूषवले होते. त्या स्पर्धेत यष्टीरक्षक-फलंदाज अँड्रीज गौस याने शानदार फलंदाजी करत 219 धावा केल्या होत्या, तर सौरभ नेत्रावलकर याने देशासाठी सर्वाधिक 6 बळी घेतले होते. नेत्रावलकर यांनी भारतासाठी 19 वर्षांखालील (U-19) वर्ल्ड कपही खेळला आहे. मात्र, भारतीय वरिष्ठ संघात संधी न मिळाल्याने त्यांनी अमेरिकेसाठी खेळण्याचा निर्णय घेतला.

​टी20 वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी अमेरिका संघ ‘भारत अ’ (India A) विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. याशिवाय, वर्ल्ड कपमधील आपल्या मोहिमेची सुरुवात अमेरिका 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत करेल, जिथे त्यांचा सामना यजमान भारताशी होणार आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---