चेन्नई । आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २६ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने अतिशय बिकट परिस्थितीतून सन्मानजनक धावसंख्या उभारली. नंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडत डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे २६ धावांनी विजय मिळवला.
या अतिशय अतीतटीच्या सामन्यात झालेले काही विक्रम-
– कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग १० वा विजय. धोनीने सलग ९ आंतराराष्ट्रीय सामने जिंकले होते.
– भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा हा ७७वा आंतराराष्ट्रीय विजय. यापूर्वी भारताने श्रीलंका (११४) आणि इंग्लंड (८२) यांना आतंराष्ट्रीय सामन्यात ७७ पेक्षा जास्त वेळा पराभूत केले आहे.
-ऑस्ट्रेलिया सप्टेंबर २०१६ नंतर कधीही परदेशात वनडे सामन्यात जिंकली नाही. सलग ११ सामन्यात ऑस्ट्रेलियाने ९ पराभव पहिले आहेत तर दोन सामन्यात निकाल लागले नाही.
-ऑस्ट्रेलियाची ही आशियातील नीचांकी वनडे धावसंख्या होती.
– कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा ५०वा आतंरराष्ट्रीय विजय आहे. अशी कामगिरी करणारा विराट ५वा खेळाडू आहे.
– २००१ नंतर प्रथमच भारतीय संघ भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यातील पहिला सामना जिंकला आहे.
-भारतातील ही सर्वात कमी षटकांची खेळवली गेलेली ही दुसरी वनडे आहे. यापूर्वी १९८५ साली भारत-इंग्लंड वनडे दुसऱ्या डावात १५ षटकांची करण्यात आली होती.
-ऑस्ट्रेलिया विरुद्ध २८१ धावा केल्यानंतर भारताचा हा केवळ दुसरा विजय आहे.
-ऑस्ट्रेलियाचा हा चेपॉक मैदानावरील वनडे सामन्यातील पहिला पराभव आहे.
– धोनीचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १००वे अर्धशतक, अशी कामगिरी करणारा जगातील १४वा खेळाडू
–अर्धशतकांचे शतक करणारा धोनी ४था भारतीय, यापूर्वी सचिन तेंडुलकर (१६४), राहुल द्रविड (१४६) आणि सौरव गांगुली (१०७) यांनी अशी कामगिरी केली आहे.
-आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० अर्धशतके करणारा धोनी केवळ दुसरा यष्टीरक्षक फलंदाज. कुमार सांगकाराच्या नावावर १५३ आंतरराष्ट्रीय अर्धशतके
– धोनी गेल्या ५ डावात पहिल्यांदाच बाद झाला आहे. त्याने गेल्या ५ डावात ४५*, ६७*, ४९* & १* आणि ७९ अश्या खेळी केल्या आहेत.
-चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर धोनी ८ डावात दुसऱ्यांदा बाद झाला आहे.
– वनडे कारकिर्दीत धोनीने जेम्स फॉकनरला ७ षटकार खेचले आहेत. दिलशान आणि वॉटसनला धोनीने वनडे कारकिर्दीत प्रत्येकी ६ षटकार खेचले आहेत.
-धोनीने १०० अर्धशतकांपैकी ६६ शतके ही वनडे कारकिर्दीत तर ३३ कसोटी आणि एक टी२० सामन्यात केले आहे.
-वनडे कारकिर्दीत भारतात भारतीय खेळाडूने ४००० धावा करायची दुसरी वेळ. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने(६९७६) ही कामगिरी केली आहे. धोनीने १०९ डावात ४०५५ धावा केल्या आहेत.
-धोनीने चेपॉक मैदानावर ४०१ वनडे सामन्यांत केल्या आहेत. असे करणारा तो पहिला खेळाडू आहे.
– धोनी यापूर्वी जेव्हा बाद झाला त्या खेळीमध्ये आणि आज या दोन बाद डावात त्याने तब्बल २४१ धावा केल्या आहेत. यापूर्वी धोनीने अशी कामगिरी करताना ३६९ धावा केल्या होत्या.
-२००० सालानंतर हॅट्रिक षटकार खेचणारा हार्दिक पंड्या हा पहिला भारतीय. विशेष म्हणजे वनडेमध्ये त्याने अशी कामगिरी २०१७मध्ये तीन वेळा केली आहे.
-हॅट्रिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पंड्या दुसऱ्या स्थानी. एबी डिव्हिलिअर्सने अशी कामगिरी ४वेळा केली आहे.