---Advertisement---

२१ वर्षीय सोफिया केनिनने पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनेचे विजेतेपद

On: शनिवार, फेब्रुवारी 1, 2020 6:27 PM
---Advertisement---

आज(1 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020मध्ये महिला एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात 21 वर्षीय सोफिया केनिने स्पेनच्या गॅब्रियन मुगुरुझाचा पराभव करत कारकिर्दीतीत पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले.

2 तास 3 मिनिट चाललेल्या या अंतिम लढतीत 14 व्या मानांकित केनिनने 26 वर्षीय मुगुरुझाचा 4-6, 6-2, 6-2 अशा फरकाने तीन सेटमध्ये पराभव केला. केनिनला पहिल्या सेटमध्ये अनुभवी मुगुरुझाकडून पराभव स्विकारावा लागला होता.

पण केनिनने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन केले आणि हा सेट जिंकला. त्यानंतर तिने तिची हीच लय कायम ठेवत तिसरा सेटमध्येही मुगुरुझावर वर्चस्व ठेवले आणि तिसरा सेट जिंकून ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदावर आपले नाव कोरले.

ती 2002 पासून सेरेना विल्यम्सनंतरची ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारी सर्वात तरुण अमेरिकन महिला टेनिसपटू ठरली आहे.

हे विजेतेपद मिळवल्यानंतर ती म्हणाली, ‘माझे स्वप्न अधिकृतरित्या पूर्ण झाले आहे. जर तूम्ही स्वप्न पाहात असाल, तर त्याचा पाठलाग करा. कारण स्वप्न पूर्ण होतात.’ तसेच तिने प्रेक्षकांचे आणि तिच्या टीमचेही आभार मानले.

या अंतिम लढतीनंंतर आता केनिन जागतिक महिला टेनिस क्रमवारीत 7 व्या क्रमांकावर झेप घेईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---