---Advertisement---

धक्कादायक! पुण्यातील २२ वर्षीय तरुणाचा क्रिकेट खेळताना दम लागून आकस्मिक मृत्यू

On: सोमवार, जून 13, 2022 3:47 PM
Cricket Ground
---Advertisement---

भारत हा क्रिकेटवेडा देश आहे. येथे अगदी गल्ली-बोळातली पोरंही क्रिकेटसाठी वेडी असतात. भारतीय क्रिकेट संघाने साध्य केलेल्या यशानंतर क्रिकेटप्रती असलेले भारतीयांचे प्रेम आणखीनच वाढले. फावला वेळ मिळाला की, मुले जमून गल्लीतील रस्त्यावर, जवळच्या मैदानावर क्रिकेटचा डाव मांडतात. असेच एका मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या पुण्यातील एका मुलाचा दम लागून आकस्मिक मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

दम लागून अकनाक मृत्यू झालेल्या मुलाचे नाव श्रीतेज सचिन घुले असून तो २२ वर्षांचा होता. पुण्यातील हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील मैदानावर खेळत असताना श्रीतेज घुलेचे निधन झाले आहे.

नेमकं काय घडलं?
माध्यमांतील वृत्तांनुसार, रविवारी (१२ जून) श्रीतेज सकाळी ७ वाजताच्या सुमारास क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. पुण्यातील हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील मैदानावर आपल्या काही मित्रांसंगे तो क्रिकेट खेळत होता. मात्र क्रिकेट खेळत असताना अचानक त्याला दम लागला आणि तो खाली कोसळला. श्रीतेज अचानक मैदानावर कोसळल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला पाणी पाजवत शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कसलाही प्रतिसाद देत नसल्याने मित्रांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले.

रुग्णालयात डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि त्याला मृत घोषित केले. आपल्या मित्राच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रमंडळीमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीतेजच्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूबद्दलची माहिती दिल्यावर त्यांच्यावर दुखाचे आभाळ कोसळले आहे. हडपसर परिसरात राहणाऱ्या श्रीतेजच्या कुटुंबियानी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की, आपला मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी घरातून बाहेर परतल्यानंतर पुन्हा कधी परतणारच नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

रुट काय थांबना गड्या! शतकांच्या बाबतीत कोहलीची केली बरोबरी

दुसऱ्या सामन्यांत बाद होताच ऋतूराजवर मीम्सचा वर्षाव, पाहा चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया

दुसऱ्या सामन्यांत बाद होताच ऋतूराजवर मीम्सचा वर्षाव, पाहा चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---