राष्ट्रीय क्रीडा दिन हा विविध देशांमध्ये राष्ट्रीय क्रीडा संघ आणि त्या देशांच्या क्रीडा परंपरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. तर भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती या दिवशी असल्याने हा दिवस क्रीडा दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.
भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसादिनी राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना ही श्रद्धांजली आहे. मेजर ध्यानचंद भारतीय आणि जागतिक हॉकीमधील एक महान व्यक्तिमत्त्व होते. आज भारतीय हॉकी दिग्गजाची 113वी जयंती आहे.
मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अहमदाबादमधील राजपूत कुटुंबात झाला. त्यांचे वडील समेश्वर सिंग यांच्याप्रमाणेच ते भारतीय सैन्यात भरती झाले आणि त्यांना तेथील खेळाची आवड निर्माण झाली. भारतीय हॉकीच्या महान खेळाडूचं मूळ नाव ध्यानसिंग होते, परंतु ते रात्रीच्या प्रकाशातच सराव करत असे आणि त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं नाव ध्यानचंद ठेवले.
आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 400 गोल केले. दरम्यान त्यानी तीन ऑलिम्पिक पदके जिंकली. त्यांच्या स्मरणार्थ दिल्लीतील राष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे 2002 मध्ये मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम असे नामकरण करण्यात आले. भारतीय हॉकीमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आले. त्यांनी आपल्या शौर्यानं फक्त खेळातच योगदान दिले नाही तर नंतरच्या काळात प्रशिक्षक म्हणूनही काम केले. पटियाला येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेत ते मुख्य प्रशिक्षक होते. तसेच, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराद्वारे भारतीय हॉकी दिग्गजाच्या नावाने दरवर्षी क्रिडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित केले जाते.
हेही वाचा-
हृदयात छिद्र होतं! भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला करावी लागली चक्क हार्ट सर्जरी
बांगलादेशविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघात मोठे बदल, या दोन घातक खेळाडूंची टीममध्ये एन्ट्री
केएल राहुलला कर्णधारपदी कायम ठेवणं लखनऊसाठी ‘फायद्याचा सौदा’! कसं ते समजून घ्या