भारताचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात १३ जुलैपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिका खेळल्या जाणार आहेत. तत्पुर्वी श्रीलंका संघाचे क्रिकेटपटू आणि बोर्ड यांच्यात वाद चालू आहे. काही क्रिकेटपटूंनी या दौऱ्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे श्रीलंका बोर्डाची चिंता वाढली होती. परंतु बुधवारी (०७ जुलै) श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी निवडलेल्या ३० क्रिकेटपटूंपैकी एकूण २९ क्रिकेटपटूंनी करारावर स्वाक्षरी केली आहे. केवळ एक क्रिकेटपटू ऍंजिलो मॅथ्यूज याने या मालिकेतून माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणामुळे त्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
Angelo Mathews, who was included in the respective 30-member squad, requested Sri Lanka Cricket to relieve him from National Duties, owing to personal reasons, until further notice. https://t.co/ZYpq69rVo4 #SLC #LKA
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 7, 2021
श्रीलंका-भारत दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. १३ जुलै ते १८ जुलै या कालावधीत उभय संघ ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर २१ ते २५ जुलैदरम्यान त्यांना ३ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेहून आली आनंदाची बातमी, हार्दिक पंड्या ‘बहुप्रतिक्षित’ भूमिकेत मैदानावर उतरणार
रोहित अन् ‘हा’ फलंदाज करणार ओपनिंग, शॉला इंग्लंडला पाठवण्याची मागणी निवडकर्त्यांनी फेटाळली!
ज्या शहरात पोरं आयआयटी, जीईई, यूपीएससीचा अभ्यास करायची, तिथलं जगच धोनीने बदललं