आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद जिंकण्यासाठी भारतासमोर अंतिम सामन्यात विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य होते. मात्र, भारतीय संघाने 209 धावांनी मागे राहिली. इंग्लंडमध्ये एका संघाने चौथ्या डावात 501 धावांचे लक्ष्य पार करत विक्रम आपल्या नावी केला. काउंटी क्रिकेटमध्ये 98 वर्षांनतर असे काही घडले आहे. जेव्हा एखाद्या संघाने चौथ्या डावात 500 च्या वर अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे.
खरं तर, केंट आणि सरे यांच्यातील काउंटी अजिंक्यपदाच्या डिव्हिजन वन सामना कॅंटरबरी येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगही खेळताना दिसून आला. मात्र, त्यांच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. केंटने प्रथम फलंदाजी करताना 301 धावा केल्या. प्रत्युत्तरात सरेचा संघ 145 धावांवर गारद झाला. संघ पहिल्या डावात 156 धावांनी मागे पडला. पण, दुसऱ्या डावात त्यांनी चमत्कारिक कामगिरी केली.
156 धावांची आघाडी मिळवल्यानंतर केंट संघाने दुसऱ्या डावात 344 धावा केल्या. त्यामुळे त्यांच्या 500 धावा झाल्या. या खेळामध्ये आपलाच विजय होईल हे सांगणे कठीण आहे. कारण, शेवटच्या क्षणी खेळ पलटू देखील शकतो आणि या सामन्यावेळी तेच पहायला मिळाले. सरे संघाने दरदार फलंदाजी करत चौथ्या डावामध्ये 5 विकेट्स शिल्लक असताना 501 धावांचे लक्ष्य गाठून विक्रम केला.
इतिहासाची झाली पुनरावृत्ती
98 वर्षांनंतर, काउंटी क्रिकेटमधील संघाने चौथ्या डावात 500 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य गाठले. सरेसाठी, चौथ्या डावात तीन फलंदाजांनी शतके झळकावली, त्यात डॉम सिबली, जेमी स्मिथ आणि बेन फोक्स यांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 8 व्यांदा चौथ्या डावात 500 पेक्षा जास्त धावा करण्याचे लक्ष काठले आहे. 2010 मध्ये भारतात झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये शेवटच्या वेळी असे घडले होते.
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा