---Advertisement---

‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा

IND-vs-PAK
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पार पडणार आहे. त्यापूर्वीच संघांनी विश्वचषकासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आयसीसीकडूनही लवकरच या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. अशात 2009 मध्ये पाकिस्तानला पहिला टी20 विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार युनूस खान याने मोठा दावा केला आहे. त्याने म्हटले आहे की, पाकिस्तान अव्वल 4 संघांमध्ये स्थान मिळवेल. त्याने पाकिस्तानच्या क्षमतांवर विश्वास व्यक्त केला आहे.

काय म्हणाला युनूस?
कराची येथे माध्यमांशी बोलताना युनूस खान (Younis Khan) याने स्पर्धेत यश मिळवण्यासाठी संघाच्या क्षमतांविषयी भाष्य केले. तसेच, सामना विजेत्या खेळाडूंवर विजयाचा विश्वास दाखवला. तो म्हणाला की, “मला पूर्ण विश्वास आहे की, पाकिस्तान विश्वचषकात अव्वल 4मध्ये जागा बनवेल. कारण, संघातील सामना विजेता तुम्हाला कोणत्याही दिवशी सामना जिंकून देऊ शकतो. आमच्याकडे नेहमीप्रमाणे चांगले वेगवान गोलंदाज आहेत आणि ते आमची ताकद असतील. आम्हाला एक संघ म्हणून खेळण्याची गरज आहे.”

बाबर आझमला शांत राहण्याचा सल्ला
युनूस खान हा पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा करणारा एकमेव पाकिस्तानी फलंदाज आहे. युनूसने भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सामन्याबाबत बोलताना बाबर आझम याला शांत राहण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला की, “भारताविरुद्धचा सामना नेहमीच दबावाचा खेळ राहिला आहे. बाबरला भारताविरुद्ध जिंकण्यासाठी प्लॅन ए आणि बी बनवण्याची गरज आहे.” खरं तर, पाकिस्तानने वनडे विश्वचषकात भारताला कधीच हरवले नाहीये. 2021मध्ये पहिल्यांदा टी20 विश्वचषकात भारताविरुद्ध विजय मिळवला होता.

कधी होऊ शकतो भारत विरुद्ध पाकिस्तान सामना?
पाकिस्तान संघ साखळी फेरीतील सामने पाच मैदानांवर खेळेल. असे म्हटले जात आहे की, भारत-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथे खेळला जाऊ शकतो. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम आहे. यामध्ये 1,32,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. (odi world cup 2023 former cricketer younis khan confident pakistan will reach top four in world cup)

महत्वाच्या बातम्या-
केकेआरचे स्टार खेळाडू गाजवणार अमेरिकेची टी20 लीग; यादीत रसेल ते रॉय, ‘या’ खेळाडूंचा समावेश
आयपीएल 2024मध्ये कोण होणार दिल्ली कॅपिटल्सचा कोच? संघमालकानेच केले स्पष्ट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---