टी20 विश्वचषक 2022 मध्ये सर्वाधिक धावा करत गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणारा फलंदाज म्हणजे विराट कोहली होय. विराटने विश्वचषकात विस्फोटक फलंदाजी करत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अव्वल क्रमांक पटकावला होता. विराट सध्या चांगल्या लयीत आहे. तो भारतीय संघासोबत बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याला खास कामगिरी करता आली नव्हती. त्याने पहिल्या सामन्यात 15 चेंडूत 9 धावांची खेळी साकारली, पण आता दुसऱ्या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. विराट कोहलीकडे विक्रम करण्याची संधी आहे.
विराट कोहली (Virat Kohli) प्रत्येक सामन्यात कोणता ना कोणता विक्रम बनवण्यासाठी ओळखला जातो. अशात बांगलादेश विरुद्ध भारत संघात बुधवारी (दि. 07 डिसेंबर) दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीकडे दोन विक्रम करण्याची संधी (Virat Kohli Can Make this Two Record) आहे. कोणते आहेत ते दोन विक्रम चला जाणून घेऊया…
बांगलादेशमध्ये बनवू शकतो 1000 धावा
विराटने बांगलादेशमध्ये आतापर्यंत 75.30च्या सरासरीने एकूण 979 धावा कुटल्या आहेत. दुसऱ्या वनडेत सामन्यात जर त्याने 21 धावा केल्या, तर तो बांगलादेशमध्ये 1000 धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज बनेल. बांगलादेशमध्ये सर्वप्रथम श्रीलंकन यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा याने 1000 धावा कुटल्या होत्या. आता विराट या विक्रमापासून फक्त 21 धावा दूर आहे.
मोडू शकतो रिकी पाँटिंगच्या शतकाचा विक्रम
विराटने आतापर्यंत त्याच्या कारकीर्दीत एकूण 71 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. विराटने शतक ठोकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग याची बरोबरीवर केली आहे. पाँटिंगनेही त्याच्या कारकीर्दीत एकूण 71 शतके ठोकली आहेत. अशात बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत विराटने शतक ठोकले, तर तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारा जगातील दुसरा फलंदाज बनले. भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर या विक्रमात अव्वलस्थानी आहे. सचिनने त्याच्या कारकीर्दीत एकूण 100 शतके मारली आहेत.
विराटने 2020पासून वनडेत केले नाही शतक
विराट कोहली याने आशिया चषक 2022मध्ये आपले 71वे आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले होते. हा टी20 क्रिकेट प्रकार होता. दुसरीकडे, त्याने त्याचे शेवटचे वनडे शतक 2019मध्ये केले होते. अशात विराट दुसऱ्या वनडेत हे दोन विक्रम करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (2nd odi against bangladesh will be important for cricketer virat kohli he can make this two records)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनिंदू हसरंगाने श्रीलंकेत रचला इतिहास; आरसीबी संघही म्हणत असेल, ‘वाह बेटे मौज कर दी’
दुसऱ्या वनडेत पहिल्या पराभवाचा वचपा काढणार का रोहितसेना? सामन्याबद्दल सर्वकाही एकाच क्लिकवर घ्या जाणून