---Advertisement---

रोहित शर्माला विश्रांती, दुसऱ्या टी२०साठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

On: बुधवार, फेब्रुवारी 27, 2019 6:41 PM
---Advertisement---

बंगळूरु। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(27 फेब्रुवारी) दुसरा आणि शेवटचा टी20 सामना आहे. हा सामना बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा सामना भारतासाठी करो या मरोचा सामना असेल. कारण दोन सामन्यांच्या या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया या मालिकेत 1-0 अशा फरकाने अघाडी आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. आजच्या या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून शिखर धवनचे पुनरागमन झाले आहे. तसेच मयंक मार्कंडे ऐवजी विजय शंकरला तर उमेश यादव ऐवजी सिद्धार्थ कौलला संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या 11 जणांच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्या टी20 सामन्यात खेळलेला 11 जणांचा संघच दुसऱ्या टी20 साठी कायम करण्यात आलेला आहे.

असे आहेत अंतिम 11 जणांचे संघ-

भारत – विराट कोहली(कर्णधार),  शिखर धवन, एमएस धोनी(यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, रिषभ पंत, कृणाल पंड्या, केएल राहुल, जसप्रीत  बुमराह, युझवेंद्र चहल, सिद्धार्थ कौल, विजय शंकर.

https://twitter.com/BCCI/status/1100744113186582529

ऑस्ट्रेलिया – ऍरॉन फिंच (कर्णधार), डॉर्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, पीटर हँड्सकोम्ब (यष्टीरक्षक), ऍशटन टर्नर, नॅथन कुल्टर-नाईल, पॅट कमिन्स, झाय रिचर्डसन, जेसन बेरेन्डडॉर्फ, ऍडम झम्पा.

महत्त्वाच्या बातम्या-

एमएस धोनी खेळतोय आंतरराष्ट्रीय टी२०चा शेवटचा सामना?

धोनी-कोहलीमधील ती खास शर्यत नक्की जिंकणार कोण?

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी२०आधी ऑस्ट्रेलिया संघाला बसला मोठा धक्का

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment