फ्लोरीडा। आज(4 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा टी20 सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने 11 जणांच्या संघात एकही बदल केलेला नाही. त्यामुळे काल(3 ऑगस्ट) पहिल्या टी20 सामन्यात खेळलेला 11 जणांचा भारतीय संघच आजच्या सामन्यात खेळणार आहे.
तसेच वेस्ट इंडीजने आजच्या सामन्यात जॉन कॅम्बेलला वगळले आहे. त्यामुळे सुनील नारायण आज सलामीला फलंदाजी करणार आहे. तसेच आज खॅरी पिएरला 11 जणांच्या वेस्ट इंडीज संघात संधी मिळाली आहे.
3 सामन्यांच्या या टी20 मालिकेत भारताने काल पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल तर वेस्ट इंडीज आज विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
दुसऱ्या टी20 सामन्यासाठी असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), मनीष पांडे, क्रृणाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
वेस्ट इंडीज – इव्हिन लुईस, सुनील नारायण, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), किरॉन पोलार्ड, शिमरॉन हेटमेयर, रोव्हमन पॉवेल, कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), किमो पॉल, खॅरी पिएर, शेल्डन कॉट्रेल, ओशान थॉमस.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–थायलंड ओपन: सात्विकसाईराज-चिराग शेट्टीने विजेतेपद जिंकत रचला इतिहास
–विराटने विंडीजविरुद्ध पहिल्या टी२०त मारला केवळ १ चौकार पण केला हा मोठा विश्वविक्रम
–४४ वर्षांपुर्वी २० युरोंसाठी तो मैदानात थेट नग्न अवस्थेत गेला