थायलंड ओपन: सात्विकसाईराज-चिराग शेट्टीने विजेतेपद जिंकत रचला इतिहास

रविवारी(4 ऑगस्ट) सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅडमिंटनपटूंच्या जोडीने थायलंड ओपनच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच या दोघांची जोडी पुरुष दुहेरी गटात बीडब्ल्यूएफच्या सुपर 500 स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे.

सात्विकसाईराज आणि चिराग यांच्या जोडीने रविवारी थायलंड ओपन पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनच्या ली जुन हुई आणि लियू यू चेन या जोडीचा 21-19, 18-21, 21-18 अशा फरकाने पराभव केला.

1 तास 2 मिनिटे चाललेल्या या अंतिम सामन्याची सुरुवात सात्विक आणि चिरागने चांगली केली होती. त्यांनी पहिल्या सेटमध्ये 10-6 अशी आघाडी मिळवली होती. पण नंतर चीनच्या जोडीने पुनरागमन करत 15-15 अशी बरोबरी साधली. पण नंतर सात्विक आणि चिरागने चांगला खेळ करत रोमांचारी झालेला हा सेट 21-19 असा जिंकला आणि सामन्यात आघाडी घेतली.

त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही सात्विक आणि चिरागने चांगली सुरुवात करत 5-2 अशी आघाडी घेतली होती. तसेच या सेटच्या मध्यंतरापर्यंत 11-9 असे ते आघाडीवर होते. पण यानंतर ली जुन हुई आणि लियू यू चेन ही जोडी पुनरागम करण्यात यशस्वी झाली. त्यांनी 14-14 अशी बरोबरी करत पुढे हा सेट 21-18 अशा फरकाने जिंकला आणि सामन्यात बरोबरी केली.

तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये भारतीय जोडी सुरुवातीला 3-6 अशी पिछाडी होती. पण त्यानंतर त्यांनी सलग 5 गुण जिंकत 8-6 अशी आघाडी मिळवली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. असे असले तरी 18-19 अशी झूंज चीनच्या जोडीने सात्विक आणि चिरागला दिली होती. पण चिराग आणि सात्विकने अखेर हा सेट 21-18 अशा फरकाने जिंकत सामनाही जिंकला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विराटने विंडीजविरुद्ध पहिल्या टी२०त मारला केवळ १ चौकार पण केला हा मोठा विश्वविक्रम

४४ वर्षांपुर्वी २० युरोंसाठी तो मैदानात थेट नग्न अवस्थेत गेला

केवळ १९ धावा करुनही विराट कोहलीने केला हा खास विक्रम, आता फक्त रोहित शर्मा आहे पुढे

You might also like

Leave A Reply