---Advertisement---

IPL 2024 : आयपीएलच्या इतिहासामध्ये आत्तापर्यत ‘या’ संघाच्या नावावर सर्वाधिक षटकार, अन् शेवटी गुजरात टायटन्स

On: शुक्रवार, मार्च 15, 2024 10:36 AM
IPL
---Advertisement---

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या नव्या पर्वाची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. तसेच आयपीएलचं 17वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. एकूण 10 संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस असणार आहे. यावेळी जेतेपदाचा दावेदार कोण? हे पहिल्या तीन टप्प्यात पहायला मिळणार आहे. 

अशातच 22 मार्चपासून आयपीएलमध्ये चौकार षटकारांची बरसात पाहायला मिळणार आहे. तसेच प्रत्येक संघात षटकार मारणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे. पण आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्या संघाच्या नावावर सर्वाधिक षटकार आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.

मुंबई इंडियन्स षटकार- 1548

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. आयपीएलच्या मागच्या 16 पर्वाचं एकंदरीत गणित पाहिलं तर मुंबई इंडियन्स हा संघ षटकारांच्या बाबतीत अव्वल स्थानी आहे. मुंबई इंडियन्सने 1548 षटकार मारले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु षटकार – 1484

षटकारांच्या बाबतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर या संघाने 1484 षटकार ठोकले आहेत. पण दुसऱ्या क्रमांकावर असूनही मागच्या 16 पर्वात एकदाही जेतेपद मिळालेलं नाही.

चेन्नई सुपर किंग्स षटकार – 1401

मुंबई इंडियन्स प्रमाणेच चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मात्र षटकाराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा संघ येतो. तसेच आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्सने एकूण 1401 षटकार मारले आहेत.

पंजाब किंग्स षटकार – 1393

आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्स संघ षटकाराच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. या संघाची जेतेपदाची झोळीही अजूनही रिकामी आहे. तर पंजाब किंग्सने मागच्या 16 हंगामात 1393 षटकार मारले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स षटकार – 1351

षटकारांच्या बाबतीत आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स हा संघ पाचव्या स्थानावर आहे. तर या संघाने 1351 षटकार मारले असून या संघाने दोनदा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

दिल्ली कॅपिटल्स षटकार – 1213

आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स हा संघ षटकारांच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे. तसेच या संघाच्या नावावर 1213 षटकार आहेत. तर या संघालाही अजूनही विजेतेपद मिळवता आलेलं नाही.

राजस्थान रॉयल्स षटकार – 1123

आयपीलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाने पहिलं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आतापर्यंत 15 पर्वात विजेतेपदाची धडपड सुरुच आहे. तसेच आतापर्यंत या संघाने 1123 षटकार मारले असून सातव्या स्थानी आहे.

सनरायझर्स हैदराबाद षटकार – 860

आयपीलमध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघाने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण गेल्या काही पर्वात या संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तर दोन पर्वात अगदी तळ गाठला होता. या संघाच्या नावावर 860 षटकार असून आठव्या स्थानी आहे.

लखनौ सुपर जायंट्स षटकार – 230

लखनौ सुपर जायंट्स हा संघ षटकाराच्या यादीत नवव्या स्थानावर आहे. या संघाने 230 षटकार मारले आहेत.

गुजरात जायंट्स षटकार – 203

गुजरात जायंट्स या संघाने 2022 च्या पर्वात एन्ट्री मारली होती. पहिल्या फटक्यातच जेतेपद मिळवलं होतं. पण षटकाराच्या बाबतीत हा संघ सर्वात तळाशी आहे आणि 203 षटकार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---