आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी अनेक संघांनी टीममध्ये बदल केले. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवून हार्दिक पंड्याला नेतृत्व दिलं. या निर्णयावरुन आता युवराज सिंग याने आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यानंतर आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळलेला भारताचा माजी फलंदाज सौरभ तिवारीने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
याबरोबरच, आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी मुंबई इंडियन्स फ्रँचायजीने मोठा निर्णय घेत रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवलं. रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्या याला नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. तर पलटणने हार्दिकला गुजरात टायटन्समधून ट्रेड केलं होतं. तसेच हार्दिकने गेल्या 2 हंगामात गुजरात टीमचा कॅप्टन होता. यासोबतच हार्दिकने पहिल्याच मोसमात गुजरातला विजयी केलं. तर दुसऱ्या हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवण्याच्या निर्णयाबाबत युवराज सिंग आणि सौरभ तिवारीने असमाधान व्यक्त केलं आहे. रोहितला आणखी एक हंगाम कर्णधार म्हणून ठेवायला हवं होतं असं मत युवराजने मांडलं आहे. तर सौरभ तिवारीने भारतीय कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करताना सांगितले आहे की, तो ज्युनियर खेळाडूंना मोकळेपणाने खेळण्याची संधी देत असतो.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 2013 साली पहिल्यांचा कॅप्टन केलं होतं. त्यानंतर रोहितनेही मुंबईला आपल्या नेतृत्वात पहिल्याच झटक्यात कर्णधारपदाची जबाबदारी घेतली होती . त्यानंतर रोहितने 2015, 2017, 2019 आणि 2020 साली आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. तसेच हार्दिकची कर्णधार म्हणून आकडेवारी दमदार आहे. हार्दिकने पहिल्याच हंगामात 2022 साली गुजरातला ट्रॉफी जिंकून दिली होती. तर 2023 मध्ये अंतिम फेरीत चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
दरम्यान, आयपीएलमध्ये फ्रँचायझीला त्याच्या भविष्याचा विचार करावा लागतो. तसेच गुजरात टायटन्ससाठी हार्दिक पांड्या ज्या प्रकारे यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध झाले ते लक्षात घेऊन मुंबई इंडियन्सने ही मोठी जबाबदारी पांड्यावर दिली असावी. याबरोबरच रोहित खेळत असतानाही त्याचा आता फक्त खेळाडू म्हणून संघात समावेश असणार आहे. आयपीएल 2008 च्या पहिल्या पर्वामध्ये एमएस धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता.
महत्त्वाच्या बातम्या-